पेंचमधील वाघिणीचा मृत्यू विषबाधेनेच | Tiger Death | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tiger
पेंचमधील वाघिणीचा मृत्यू विषबाधेनेच

पेंचमधील वाघिणीचा मृत्यू विषबाधेनेच

नागपूर - पेंच व्याघ्र प्रकल्पातील (Pench Tiger Project) सालेघाट वन परिक्षेत्रातील पाथरी बिटमध्ये गेल्या आठवड्यात मृतावस्थेत सापडलेल्या वाघिणीचा (Tiger Death) मृत्यू विषबाधेमुळे (Poison) झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून (Report) उघड झाले आहे. त्यामुळे वन विभागात खळबळ उडाली आहे. संरक्षित क्षेत्रातील वाघाचा मृत्यू होणे हे वन विभागासाठी चिंता वाढविणारी बाब आहे. मृत वाघिणीच्या दोन बछड्यांची शोध मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यासाठी ६० कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत.

पेंच व्याघ्र प्रकल्पात पाच ते सहा वर्षे वयोगटातील टी ३५ नावाची वाघीण कंपार्टमेंट क्रमांक ६३५ ​​मध्ये मृतावस्थेत आढळून आली. सर्व शारीरिक सुस्थितीत असल्याने शिकार झाली नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आता प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालानुसार त्या वाघिणीचा मृत्यू हा विषामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तीच्या व्हिसेऱ्याचा नमुना येथील प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या अहवालानंतर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल असे क्षेत्र संचालकांचे म्हणणे आहे.

वाघिणीचा मृतदेह सापडलेल्या संपूर्ण परिसरात शोध घेतला जात आहे. या वाघिणीला अंदाजे ११ महिन्यांच्या दोन बछड्यांवर नजर ठेवण्यासाठी ६० कॅमेरा ट्रॅप्स लावण्यात आलेले आहेत. याशिवाय, संपूर्ण परिसरात कसून शोध मोहीम राबवली जात आहे. त्यासाठी एसटीपीएफ कर्मचाऱ्यांसह चार पथके तैनात करण्यात आली आहेत. मात्र, अद्यापही परिसरातील कॅमेरा ट्रॅपमध्ये बछड्यांचे कोणतेही छायाचित्र मिळालेले नाही. शोध सुरू आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :tigerdeath
loading image
go to top