सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू

पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात बुडू लागले
Drowned in the river
Drowned in the riverDrowned in the river

टाकळघाट (जि. नागपूर) : दोन मुलं जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. दोघांनाही नदीत पोहण्याचा मोह आवरला नाही. नदीत उतरताच मुलांचा बुडून मृत्यू (Death of two children) झाला. ही घटना सोमवारी बुटीबोरी एमआयडीसीतील गणेशपूर येथे घडली. रिजवान जनकब खान (वय ११) आणि इमामुल रुस्तम खान (वय ८) दोघेही राहणार गणेशपूर अशी मृत मुलांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूस्तम खान हे गणेशपूर येथे राहतात. दोघेही पती-पत्नी मोलमजुरी करतात. सोमवारी सरपण गोळा करण्यासाठी त्यांची पत्नी व कुटुंबातील महिला, मुले, मुली अशे सहा ते सात जण गणेशपूरजवळ असलेल्या क्रिष्णा नदीच्या परिसरात गेल्या होत्या. त्यांचा मुलगा इमामुल आणि नातेवाईक असलेला (भासा) रिजवान हे दोघेही आईकडे हट्ट करून जंगलात गेले.

Drowned in the river
यशोमती ठाकूर यांचे नरेंद्र मोदींना उत्तर; म्हणाल्या...

महिला जंगलात सरपण गोळा करीत असताना रिजवान आणि इमामुल हे दोघेही बाजूलाच असलेल्या क्रिष्णा नदीच्या काठावर गेले. काही वेळातच त्यांना पाण्यात आंघोळ करण्याचा मोह सुटला. महिलांचे आपल्याकडे लक्ष नसल्याचे बघून दोघांनीही कपडे काढले आणि नदीत (Drowned in the river) उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात बुडू (Death of two children) लागले.

दोघेही गटांगळ्या खाऊन पाण्यात बुडून मरण पावले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा गायकवाड व एमआयडीसीचे ठाणेदार अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने एका मुलाला पाण्यातून बाहेर काढले. काही वेळांनी दुसऱ्या मुलालाही बाहेर काढण्यात आले. मात्र, दोघांचाही मृत्यू झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी बोरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com