esakal | ऍड. अंजली साळवे यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन, हे आहे कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

Demand for reservation in district level posts

उपसमितीच्या कार्यकक्षेत येणाऱ्या आठही जिल्ह्यातील ओबीसीसोबतच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गाची सध्याची जनगणना करून ती जाहीर करावी व सदर जिल्हा पातळीवर जिल्हा प्रशासनाच्या अधिनस्त सरळसेवा पदभरतीत गट-क व गट-ड सोबातच गट-अ व गट-ब तसेच या सर्व गटाच्या कंत्राटी तत्वावर होणाऱ्या पदभरतीतसुद्धा आरक्षण निश्‍चिती संदर्भात उपाययोजना सूचविण्याचा अंतर्भाव असावा.

ऍड. अंजली साळवे यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन, हे आहे कारण...

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर : आठ ओबीसीबहुल जिल्ह्यांतील इतर मागासवर्गीय तसेच विमुक्त जाती भटक्‍या जमाती प्रवर्गाच्या आरक्षण निश्‍चितीसाठी सरकारने उपसमिती तयार केली आहे. समितीने आठही जिल्ह्यांसह राज्यभरातील ओबीसींची जनगणना करावी, सोबतच जिल्हा पातळीवरील सर्व गटाच्या पदभरतीत आरक्षण निश्‍चिती संदर्भात उपाययोजना सूचवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या व ओबीसीच्या जनगणनेचा मुद्दा न्यायालय ते संसदेत पोहोचविणाऱ्या "पाटी लावा' मोहिमेच्या प्रणेत्या डॉ. ऍड. अंजली साळवे यांनी केली आहे. 

उपसमितीच्या कार्यकक्षेत येणाऱ्या आठही जिल्ह्यातील ओबीसीसोबतच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गाची सध्याची जनगणना करून ती जाहीर करावी व सदर जिल्हा पातळीवर जिल्हा प्रशासनाच्या अधिनस्त सरळसेवा पदभरतीत गट-क व गट-ड सोबातच गट-अ व गट-ब तसेच या सर्व गटाच्या कंत्राटी तत्वावर होणाऱ्या पदभरतीतसुद्धा आरक्षण निश्‍चिती संदर्भात उपाययोजना सूचविण्याचा अंतर्भाव असावा, अशी मागणी डॉ. साळवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच उपसमितीचे अध्यक्ष छगन भुजबळ आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

जाणून घ्या - मुलांच्या हट्टापोटी वडिलांनी घेतला स्मार्टफोन, बहीण-भाऊ दोघेही खूश; मात्र, आईने मध्यस्ती केल्याने मुलीची आत्महत्या

संबंधित जिल्ह्यात ओबीसी व विजाभज समाजाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. सुशिक्षित तरुणांच्या बेरोजगारीचे प्रमाण फारच अधिक आहे. जिल्हा पातळीवर जिल्हा प्रशासनाच्या अधिनस्थ सरळसेवा व कंत्राटी तत्वावर अनेक पद भरत्या निघत असतात. यात जास्तीतजास्त पद भरत्या कंत्राटी तत्वावर असतात. उपसमितीने ओबीसी प्रवर्गाची जनगणना करून ती जाहीर करावी, अशी आग्रही मागणी डॉ. साळवे यांनी निवेदनात केली आहे. 

सरथी व बार्टीच्या धरतीवर "महाज्योती'चे काम सुरू व्हावे

"सारथी' व "बार्टी'च्या धरतीवर ओबींसाठी "महाज्योती'ची स्थापना करण्यात आली आहे. महाज्योतीला तत्काळ कार्यान्वित करीत ओबीसी युवकांच्या उन्नतीचा मार्ग मोकळा करण्याची मागणी डॉ. साळवे यांनी केली आहे. यामागणी संदर्भात त्यांनी बहुजन विकास मंती विजय वडेट्टीवार यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. ही मागणी उपसमितीच्या बैठकीत मांडण्याचे आश्‍वासन वडेट्टीवार यांनी दिले असून या संस्थेचे काम सारथी व बार्टीच्या धरतीवरच राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. 

संपादन - नीलेश डाखोरे