esakal | 'या' वादग्रस्त विधानामुळे कोळसे पाटील पुन्हा चर्चेत, भाजयुमो कार्यकर्ते संतापले
sakal

बोलून बातमी शोधा

demanded to file a case against Former Justice Kolse Patil

"पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांचा मृत्यू पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या गोळीतून नव्हे तर महाराष्ट्र पोलिसांच्या "पॉईंट नाईन' या पिस्तूलातून गोळी झाडून करण्यात आला होता. हे कृत्य मुंबई पोलिस दलातील हिंदुत्ववाद्याने केले असावे,' असा दावा कोळसे पाटील यांनी केल्याचा आरोपी दाणी यांनी केला आहे. 

'या' वादग्रस्त विधानामुळे कोळसे पाटील पुन्हा चर्चेत, भाजयुमो कार्यकर्ते संतापले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी शहीद हेमंत करकरे आणि माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्याबाबत वादग्रस्त वक्‍तव्य केले. यामुळे हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होऊ शकते. त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष शिवाणी दाणी यांनी पोलिस सहआयुक्‍त रवींद्र कदम यांना दिले आहे. 

रविवारी अलायन्स अगेंस्ट सीसीए-एनआरसी-एनपीआरच्यावतीने नागपुरातील जाफरनगरात इदगाह मैदानावर संविधान जागरण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात अनेक वादग्रस्त वक्‍तव्य केल्याचा आरोप दाणी यांनी केला आहे. "पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांचा मृत्यू पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या गोळीतून नव्हे तर महाराष्ट्र पोलिसांच्या "पॉईंट नाईन' या पिस्तूलातून गोळी झाडून करण्यात आला होता. हे कृत्य मुंबई पोलिस दलातील हिंदुत्ववाद्याने केले असावे,' असा दावा कोळसे पाटील यांनी केल्याचा आरोपी दाणी यांनी केला आहे. 

जाणून घ्या - आई आणि तिने मिळून निवडले तांदूळ अन्‌ वरच्या माळ्यावर निघून गेली

वादग्रस्त विधानानंतर त्यांनी "मालेगाव बॉम्बस्फोटात अनेक वर्षे अटकेत असलेला कर्नल पुरोहित याने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या इशाऱ्यावरून काम केले होते. त्यानंतर त्याच कर्नल पुरोहितने डॉ. भागवत यांच्या हत्येचा कट रचला होता. तसेच त्यांची हत्या करण्यासाठी शार्प शुटर्सला "सुपारी'सुद्धा दिली होती,' असा आरोप माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी केल्याच आरोप दाणी यांनी तक्रारीत केला आहे. 

देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्‍तव्य केले. वाजपेयी हे प्रत्येक विदेशी दौऱ्यावर जात असताना महिलांना सोबत नेत होते, असे वादग्रस्त वक्‍तव्य कोळसे पाटील यांनी केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. कोळसे पाटील यांच्या भाषणाचे पडसाद शहरभर उमटले.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांच्या वक्‍तव्याचा निषेध व्यक्‍त करण्यात आला. तसेच भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष शिवाणी दाणी यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना घेऊन पोलिस आयुक्‍त कार्यालयात सहआयुक्‍त रवींद्र कदम यांची भेट घेतली. त्यांनी कोळसे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात सहआयुक्‍तांकडे लेखी तक्रार दिली. कोळसे पाटील यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. 

सविस्तर वाचा - मोकाट जनावरांमुळे गेला पतीचा जीव; पत्नीचा दहा लाखांचा नुकसानभरपाईचा दावा!

पोलिसांना दिले पुरावे 
माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी आक्षेपार्ह वक्‍तव्य केले आहे. त्यांच्या वक्‍तव्यामुळे हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होऊ शकते. अटल बिहारी वाजपेयी यांच्याविरुद्ध त्यांनी गरळ ओकली आहे. त्यांच्याविरुद्ध आम्ही लेखी तक्रार पोलिसांत केली असून, त्या संदर्भातील पुरावे पोलिसांना दिले आहेत. पोलिसांनी शहानिशा करून त्वरित गुन्हे दाखल करावे. 
- शिवाणी दाणी, 
अध्यक्षा, भाजयुमो

तक्रारीची शहानिशा केली जाईल 
कोळसे पाटील यांनी आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्यासंदर्भात लेखी तक्रार प्राप्त झाली आहे. तसेच पेनड्राईव्ह दिला आहे. स्पेशन ब्रॅंचकडून तक्रारीची चौकशी आणि शहानिशा केली जाईल. जर आक्षेपार्ह आणि कायद्याच्या विरोधात वक्‍तव्य असल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 
- रवींद्र कदम, 
पोलिस सहआयुक्‍त

loading image