esakal | आता डेंगी तपासणी किटचाही तुडवडा, ७०० नमुने तपासणीच्या प्रतीक्षेत
sakal

बोलून बातमी शोधा

dengue testing kit

आता डेंगी तपासणी किटचाही तुडवडा, ७०० नमुने तपासणीच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहे. तर अचानक डेंगीच्या आजाराने थैमान घातले आहे. गेल्या महिनाभरात अडिचशेपेक्षा अधिक डेंगीग्रस्तांची नोंद (nagpur dengue cases) झाली आहे. मात्र, डेंगींच्या निदानासाठी आवश्यक असलेल्या किटस् महापालिकेकडे (nagpur municipal corporation) नसल्यामुळे ७०० डेंगीग्रस्तांचे नमूने तपासणीच्या (dengue testing kit) प्रतीक्षेत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ७०० जणांच्या रक्ताच्या नमून्यांचा अहवाल प्राप्त न झाल्याने त्यांच्या जीवाशी हा एकप्रकारचा खेळ सुरू आहे.

हेही वाचा: आता डेंगीचा धोका, एकाच महिन्यात २०० पेक्षा अधिक रुग्ण

शहराच्या साथ आजारावरील नियंत्रणाची नाहीतर उपचाराची देखील जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागाची आहे. मात्र, महापालिकेच्या उदासीन धोरणामुळे शहरात साथ आजाराचा भडका उडाला आहे. खासगी रुग्णालयातील उपचार आवाक्यात नसल्यामुळे गरीब रुग्णांना महापालिकेच्या तसेच सरकारी रुग्णालयाशिवाय पर्याय नाही. दर दिवसाला एका रुग्णालयात शंभरावर संशयितांची नोंद होत असल्याने दर दिवसाला नमूने तपासणीचा आकडा फुगणार आहे. यामुळे तपासणीसाठी जावे तरी कुठे असा प्रश्न गरिबांसमोर उभा ठाकला आहे. डेंगीचे अनेक रुग्ण तपासणीसाठी मेडिकलमध्ये येतात. पण तेथेही किट नसल्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी येथील रुग्णांना देखील खासगी ‘पॅथालॉजी’कडे पाठविले जात असल्याचे प्रकरण उजेडात आले होते. यासंदर्भात संबधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी किटची मागणी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे नोंदविली असून लवकरच उपलब्ध होतील, असे सांगितले.

पुण्याच्या एनआयव्हीकडून होतो पुरवठा -

महापालिकेला डेंगी तपासणीच्या किटचा पुरवठा हा पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडून होतो. डेंगीचा उद्रेक झाल्यानंतर अतिरिक्त किटची मागणी केली आहे. एका किटमध्ये ९२ जणांच्या तपासणी होतात. मात्र, किट उपलब्ध नसल्यामुळे दर दिवसाला शंभरावर रुग्णांना खासगीचा रस्ता दाखवला जातो. डेंगी हा नोटिफाईड आजार आहे, यामुळे खासगी रुग्णालयात डेगीग्रस्त आढळल्यानंतर त्याची नोंद महापालिकेकडे होणे आवश्यक आहे.

डेंगीचा उद्रेक मागील महिनाभरापासून सुरू आहे. महापालिकेमधील डेंगी तपासणीच्या किट संपल्यानंतर अतिरिक्त किटची मागणी तत्काळ करणे आवश्यक आहे. मागणी केल्यानंतरही किट उपलब्ध होत नसल्यास महापालिकेने खरेदी करावे. रुग्णांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
-जयंत टेंभूरकर, सामाजिक कार्यकर्ता, नागपूर.
loading image
go to top