सचिन सावंतांना मी काय उत्तर देणार? बदल्यांचा रिर्पोट नवाब मलिक यांनीच फोडला

Devendra Fadanvis said Nawab Malik himself broke the report of the transfer
Devendra Fadanvis said Nawab Malik himself broke the report of the transfer
Updated on

नागपूर : सचिन वाझे याचे प्रकरण शांत होत नसल्याचे दिसत आहे. या प्रकरणाला धरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या प्रकरणामुळे राज्याची सर्वाधिक बदनामी झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला शंभर कोटी मागितल्याचा आरोप केला होता. या लेटर बॉम्बमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. मनसुख हिरेन यांचा मृत्यू, सचिन वाझे या प्रकरणामुळे राज्याची सर्वाधिक बदनामी झाल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आता या प्रकरणाची एनआयएच्या माध्यमातून चौकशी होणार आहे. चौकशीत बऱ्याच खऱ्या गोष्टी बाहेर येतील. यामुळे महाविकासआघाडीत अस्वस्थता निर्माण झाली असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यालयातील सीसीटीव्ही गायब होऊ शकत नाही. बॅकअप मेन सर्व्हरला आहेत. सचिन सावंत यांना मी काय उत्तर देणार आहे. चौकशीने अनेकांचे बिंग फुटण्याची शक्यता आहे. बदल्यांचा रिर्पोट नवाब मलिक यांनीच फोडला, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने चिंता

कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने चिंता वाढली आहे. यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळविणे गरजेचे झाले आहे. शहरातील स्थिती भयानक झाली आहे. लॉकडाउन हा काही पर्याय नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

40-Year Illegal Quarrying Row: Collector Asked to Submit Report Within a Week
Yavatmal fake marriage case
veterinary officer corruption allegations
Gondia tehsil office bribery case
Marathi News Esakal
www.esakal.com