esakal | 'सरकारचे कोरोनासंदर्भातील पॅकेज निव्वळ धुळफेक, मुंबई अन् पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे'
sakal

बोलून बातमी शोधा

देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

'सरकारचे कोरोनासंदर्भातील पॅकेज निव्वळ धुळफेक, मुंबई अन् पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे'

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कमी झाली आहे. लॉकडाऊनची घोषणा होणार उलाढालीमध्ये गडबड झाली आहे. राज्य सरकारने व्हेंटीलेटर, बेड्स, ऑक्सिजनच्या संदर्भात व्यवस्थापन करावे. सरकारने ऑक्सिजनच्या लॉजिस्टीक मॅनेजमेंट करावे. कारण ऑक्सिजनची कमतरता नाही. मुंबई आणि पुणे ही आपली महत्वाची शहरं आहे. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, मुंबई अन् पुण्याच्या बाहेर महाराष्ट्र आहे हे या सरकारला माहिती नाही. त्यामुळे नागपुरात स्थिती गंभीर झाली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी जवळपास १० मिनिटे विनामास्क पत्रकारांशी संवाद साधला.

सरकार लॉकाडाऊन लावणार असेल तर विविध घटकांना त्यांनी मदत केली पाहिजे ही आमची भूमिका होती. पण, सरकारने जाहीर केलेले ३ हजार ३०० कोटी रुपयांचे पॅकेज हे निव्वळ धुळफेक आहे. कोरोनाच्या संदर्भात ही सागंण्यात आलेली तरतूद ती रेग्युलर बजेटमधली तरदूत आहे. त्यामुळे ३ हजार ३०० कोटी हे कोरोनासाठी दिलेले नाहीत. मुळात सरकारकडून अपेक्षा होती, किती बेड्स वाढविणार, व्हेंटीलेटर वाढविणार याची अपेक्षा होती. मात्र, बारा बलुतेदारांना मदत केली नाही. दिशाभूल करण्यात आली. वृद्धपकाळ योजना, श्रावणबाळा योजना या केंद्र सरकारच्या योजना आहेत. केंद्रसरकारकडून मिळालेल्या निधीत राज्य सरकार थोडाफार निधी देतात, तोच निधी अॅडव्हान्स देत आहे. खावटी अनुदान चार हजाराचं अनुदान मागच्या वर्षी मिळालं नाही. यंदा फक्त २ हजारंच दिले जात आहे. त्यामुळे आदिवासींच्या तोंडाला देखील पाने पुसले आहे, असा आरोपही फडणवीसांनी केला.

स्ट्रीट वेंडर्सला मदत करू, अशी घोषणा केली. केंद्र सरकारकडून घोषणा आधीच झाली होती. ती मदत मिळाली देखील. मात्र, आता राज्य शासनाच्या घोषणेमुळे फक्त मुंबई आणि ठाण्यातील स्ट्रीट वेंडर्सला फायदा होणार आहे. रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना पार्सला सुविधा उपलब्ध करून देऊ, असं सरकारनं सांगितलं. मात्र, ते कसं काय पार्सल देऊ शकणार आहे, असा सवालही फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.