esakal | मुंबईतील हेवीवेट मंत्र्यांना रेमडेसिव्हीर दिले, पण नागपूरसोबत भेदभाव - फडणवीस

बोलून बातमी शोधा

devendra fadnavis

मुंबईतील हेवीवेट मंत्र्यांना रेमडेसिव्हीर दिले, पण नागपूरसोबत भेदभाव - फडणवीस

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : रेमडेसिव्हीरच्या वाटपात भेदभाव होत होता. नागपूरला एकाचवेळी पाचशे रेमडेसिव्हीर देण्यात आले. त्यानंतर दिले नाही. मुंबईतील हेवीवेट मंत्र्यांना मोठ्या प्रमाणात रेमडेसिव्हीर देण्यात आले होते. सरकारने व्यवस्थित नियोजन करून वाटप करणे गरजेचे आहे. ज्याठिकाणी जास्त रुग्ण आहेत, त्या जिल्ह्याला जास्त रेमडेसिव्हीर देण्यात यावे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज ते नागपुरात बोलत होते.

हेही वाचा: 'वयात बसत नसताना फडणवीसांच्या पुतण्याला लसीचा दुसरा डोस मिळालाच कसा?'

शहरामधील कोरोना रुग्णांचा आकडा हजारावर पोहोचला असताना राज्य शासनाने शहरातील रुग्णालयांना १० हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन तातडीने द्यावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. तसेच, अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिस आयुक्तांनी रुग्णालय आणि फार्माकुटिकल्स दुकानांच्या बाहेर पोलिस कुमक पुरवावी असेही आदेशामध्ये नमूद केले. त्याबाबतही देवेंद्र फडणवीसांनी न्यायालयाचे आभार मानले.

गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिव्हीरचा काळाबाजार होत असल्याचे समोर येत आहे. अनेक रुग्णांना रेमडेसिव्हीर न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. तसेच हजारोच्या किमतीमध्ये हे इंजेक्शन विकले गेले. राज्यात रेमडेसिव्हीर तुटवडा असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर नितीन गडकरी यांनी केंद्राला परवानगी मागत वर्धा येथे रेमडेसिव्हीरचे प्रोडक्शन करण्याला मंजुरी मिळवून दिली. त्यामुळे काही प्रमाणात का होईना, रुग्णांना दिलासा मिळणार आहे.