

फडणवीसांच्या नागपुरातील विजयरथावरून अमित शाहांचा फोटो गायब झालेला पहायला मिळाला आहे
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून सत्तानाट्य सुरु आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी वेगाने घडल्या. यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. दरम्यान, या घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात पोहोचले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील विजयरथावरून अमित शाहांचा फोटो गायब झालेला पहायला मिळाला आहे. मुंबईतील जल्लोषाच्या वेळीही अमित शहा यांचा फोटो बॅनरवर नव्हता. त्यामुळे भाजपात या मुद्द्यावरून अंतर्गत वाद आहे का? किंवा फडणवीस हे भाजपावर नाराज आहे का? असा चर्चांना उधाण आलं आहे.
उपमुख्यमंत्री म्हणून वर्णी लागल्याने फडणवीस नाराज असल्याच्या प्रतिक्रियाही आल्या होत्या. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईत भाजपकडून जल्लोष साजरा केला यावेळी जल्लोषासाठी ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरवर भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो लागलेला नव्हता. त्यामुळे फडणवीस अमित शाह यांच्यावर नाराज आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
शपथविधीआधी झालेल्या पत्रकार परिषदेत आपण सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर पंतप्रधान मोदींसह अमित शाह, जे.पी नड्डा यांनी ट्विट करत फडणवीसांना उपमुख्यमंत्रपदी विराजमान होण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मात्र या पदभारामुळे ते खूश नाहीत, अशी चर्चाही रंगू लागली होती. आता नागपुरमध्येही फोटो लागले नसल्याने अनेक चर्चांना राजकीय वर्तुळात ऊत आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.