esakal | देवेंद्र फडणवीस यांनी घेतला म्युकरमायकोसिसचा आढावा; २०० खाटांचे रुग्णालय सज्ज ठेवण्याची सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

म्युकरमायकोसिसचा आढावा; २०० खाटांचे रुग्णालय सज्ज ठेवण्याची सूचना

म्युकरमायकोसिसचा आढावा; २०० खाटांचे रुग्णालय सज्ज ठेवण्याची सूचना

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : कोरोना विषाणूच्या (coronavirus) तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेता नागपुरात लहान बालकांसाठी २०० खाटांचे रुग्णालय सुसज्ज ठेवावे, अशी सूचना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी महापालिकेला केली. यासाठी आवश्यक ती सर्व मदत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटतर्फे करण्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. म्युकरमायकोसिसच्या (Mucor mycosis) स्थितीचा सुद्धा त्यांनी बैठकीतून आढावा घेतला. (Devendra Fadnavis reviews mucormycosis)

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महापालिकेचे अधिकारी, महापौर आणि अन्य लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेतली. महापालिका आयुक्त, महापौर दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, सत्ता पक्षनेते अविनाश ठाकरे आणि इतरही उपस्थित होते. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेता काय उपाययोजना केल्या आहेत आणि आणखी काय करता येईल, याबाबत सुद्धा सविस्तर चर्चा झाली.

हेही वाचा: चंद्रशेखर बावनकुळे अचानक मौनात! राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

पूर्वतयारीचा एक भाग म्हणून पालिकेच्यावतीने लहान मुलांसाठी २०० खाटांचे रुग्णालय तातडीने उभारण्यात यावे, अशी सूचना फडणवीस यांनी केली. हे रुग्णालय उभारताना प्रत्येक वयोगटाच्या विविध गरजा लक्षात घेऊन याची रचना करावे लागेल असे ते म्हणाले. म्युकरमायकोसिस रुग्णांची नागपुरातील स्थिती, त्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि संभाव्य तिसरी लाट विचारात घेता हाती घ्यावयाच्या उपाययोजना इत्यादींबाबत सविस्तर चर्चा बैठकीत झाली.

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे स्क्रिनिंग लवकर व्हावे, म्हणजे वेळेत उपचार करून त्या रुग्णाला लवकर दिलासा मिळेल, असे फडणवीस म्हणाले. कॉल सेंटरची स्थापना करून स्क्रिनिंगची आणि वेळेत उपचारांची योग्य स्ट्रॅटजी तयार करण्यात यावी, अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला. पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देत यासाठी ऑपरेशन थिएटर्सची संख्या वाढविण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला.

हेही वाचा: विदर्भात १५ जूनपर्यंत मॉन्सून धडकणार? हवामान विभागातर्फे संकेत

इस्पितळ कुठे होणार?

बालकांसाठी रुग्णालय स्थापन करण्यासाठी सर्वांचे एकमत झाल्यानंतर ते कुठे उभारावे याबाबत बैठकित अंतिम निर्णय होऊ शकला नाही. इस्पितळ शहराच्या मध्यवर्ती भागात आणि सर्वांच्या सोयीचे ठिकाणी असावे अशी सूचना करण्यात आली. मनपा आयुक्तांनी रेशीमबागेजवळच्या जागेचा पर्याय सुचविल्याचे कळते.

(Devendra Fadnavis reviews mucormycosis)