Devendra Fadnavis: होरिबाने बुटीबोरीत सेमिकंडक्टर प्रकल्प सुरू करावा: देवेंद्र फडणवीस

बुटीबोरी एमआयडीसी येथे होरिबा कंपनीच्या वैद्यकीय उपकरण आणि कंज्युमेबल्स (रिएजंटस) उत्पादन प्रकल्पाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.
Devendra Fadanvis:  होरिबाने बुटीबोरीत सेमिकंडक्टर प्रकल्प सुरू करावा: देवेंद्र फडणवीस
Devendra Fadanvis Nashik Dauraesakal
Updated on

नागपूर: ‘राज्यात सेमिकंडक्टरचा प्रकल्प यावा यासाठी काही कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे. होरिबाने वैद्यकीय उपकरण आणि कंज्युमेबल्स उत्पादन प्रकल्प अत्यंत वेगाने सुरू केला. त्यामुळे त्यांनीच आता सेमिकंडक्टरचा प्रकल्प सुरू करावा. त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य राज्य सरकारद्वारे करण्यात येईल,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बुटीबोरी एमआयडीसी येथे होरिबा कंपनीच्या वैद्यकीय उपकरण आणि कंज्युमेबल्स (रिएजंटस) उत्पादन प्रकल्पाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, होरिबा लिमिटेडचे चेअरमन आणि समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अत्सुशी होरिबा, होरिबा इंडियाचे चेअरमन डॉ. जय हाकू, होरिबा इंडियाचे अध्यक्ष डॉ. राजीव गौतम, माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांची उपस्थिती होती.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योग समूह आता नागपूरकडे आकर्षित होत आहेत. जपान येथील होरिबा कंपनीच्या या नवीन अत्याधुनिक प्रकल्पाच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्राला नवी ओळख मिळाली आहे. बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेल्या या प्रकल्पामुळे भारतातील सुमारे ३० हजार डायग्नॉस्टिक लॅब यांना अत्यावश्यक महत्त्वाची उपकरणे पुरवली जाणार आहेत.

तपासणी प्रयोगशाळेसाठी लागणारे सोल्यूशन्स व इलेक्ट्रॉनिक चिप्सवर होरिबा कंपनीचे कार्य आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठी ही निर्मिती महत्त्वाची आहे.
जगातील मेडिकल टुरिझम हब म्हणून भारताने अल्पावधीत संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. येथील वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक पातळीवरील सुविधा व तज्ज्ञ वैद्यकीय सेवांच्या माध्यमातून आपण जगाला वेगळी ओळख देऊ. याचबरोबर भारत आता सेमी कंडक्टरचा हब ठरला आहे. होरिबा कंपनीने इथे सेमिकंडक्टर प्रकल्पाबाबत विचार करावा, असेही फडणवीस म्हणाले.

वाहन उद्योगातील उलाढाल ५० लाख कोटींवर नेणार ः गडकरी
वाहन उद्योगाच्या क्षेत्रात जपानने चांगली प्रगती केली आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत भारताने जपानला मागे टाकले आहे. भारतातील वाहन उद्योगातील उलाढाल ७ लाख कोटींवरून २० लाख कोटींवर पोहचली आहे. येत्या काळात ही उलाढाल ५० लाख कोटींवर पोहचविण्याचा प्रयत्न आहे. सेमी कंडक्टरचा प्रकल्प आल्यास नक्कीच रोजगार निर्मिती होईल.’ बुटीबोरी येथे ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू होण्याची गरज आहे. भारतातून जवळपास ४० हजार कोटींची निर्यात सुरू असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.