Nagpur to Pandharpur Cycle Yatra : नागपूर ते पंढरपूर सायकलवारीत ८५ सायकलस्वार भक्तिभावाने सहभागी झाले. यात्रेचा समारोप ४५०० सायकलस्वारांच्या उपस्थितीत पंढरपुरात झाला.
हिंगणा : दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ जून रोजी मोठ्या उत्साहाने पार पडलेली नागपूर-पंढरपूर सायकलवारी सायकलस्वारांच्या भक्तिभावनेने भरलेली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवी झेंडी दाखवून या वारीला सुरुवात केली.