राणे फॅमिली सुसाईड मिस्ट्री: अजून एक ट्टिस्ट; मृत धीरजची आई अचानक प्रगटली .. केले हे गंभीर आरोप 

Dhiraj mother come front of police Another twist in Rane case
Dhiraj mother come front of police Another twist in Rane case

नागपूर : काही दिवसांपूर्वी नागपुरातील कोराडी येथे राहणाऱ्या राणे कुटुंबातील ४ जणांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली होती. यात पती-पत्नी आणि २ लहान मुलांचा समावेश होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र प्रकरणात 'ट्विस्ट पे ट्विस्ट' येत आहेत. आत अजून एक ट्विस्ट आला आहे.  

प्राध्यापक धीरज राणेला लहानपणी सोडून गेलेली त्याची आई अचानक समोर आली. धीरजला आईची माया लागली होती. त्यांच्या भेटी पण व्हायला लागल्या होत्या.

याच कारणावरून पती-पत्नीत भांडण व्हायला लागले होते. पती आम्हाला सोडून आईकडे जाऊ शकते किंवा आई घरात राहायला येऊ शकते. सुखी संसार येणाऱ्या सासूमुळे बिघडेल, अशी भीती डॉ. सुषमा हिला होती. त्यामुळेच डॉ. सुषमा हिने तिघांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, डॉ. सुषमा राणे हिने पती प्रा. धीरज राणे, मुलगा ध्रुव आणि मुलगी लावण्या यांना जेवणातून झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या. त्यानंतर तिघांनाही ॲनेस्थेसियाचे हायडोज इंजेक्शन्स दिलेत. तिघांचाही मृत्यू झाल्यानंतर डॉ. सुषमाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. १८ ऑगस्टला घडलेल्या राणे कुटुंब आत्महत्या प्रकरणाचा गुंता वाढता वाढत चालला आहे. 

डॉ. सुषमा राणे हीने पती व मुलांचा जीव का घेतला? याचा उलगडा पोलिसांना अद्याप करता आला नाही. प्रा. धीरज याच्या वडीलाचा बालपणातच मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याच्या आईने मुलाला आत्याकडे सोडून दुसरे लग्न केले होते. दुसऱ्या पतीचाही गेल्या काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. आईने मुलगा धीरज याचा शोध घेतला. त्याची भेट घेतली. दोघे मायलेक गहिवरले. याचा माहिती डॉ. सुषमाला मिळाली होती. याच कारणावरून पती-पत्नीत भांडन व्हायला लागले होते.


संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com