गुरु-शिष्याचे नाते म्हणून शिवरायांचं उदाहरण दिलं, पण...; बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी मागितली माफी

Dhirendra Shastri : धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानावर त्यांनी माफी मागितली आहे. आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला असं त्यांनी म्हटलं.
Dhirendra Krishna Shastri
Dhirendra Krishna Shastriesakal
Updated on

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानावर त्यांनी माफी मागितली आहे. माझ्या विधानाचा विपर्यास केला असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले. नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराज लढून थकले होते. तेव्हा ते रामदास स्वामींकडे गेले आणि राजपाट तुम्ही सांभाळा अशी विनंती केली. धीरेंद्र शास्त्री यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही इतिहासात असा कोणताच दाखला नसल्याचं म्हटलं होतं. Dhirendra Shastri Apologises After Controversy

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com