

Dhirendra Shastri Controversy Continues Despite Apology
Esakal
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर माफी मागितली. मात्र त्यानंतरही ते विविध कारणाने चर्चेत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी बागेश्वर बाबांना आव्हान दिलं आहे. याला उत्तर देताना धीरेंद्र शास्त्रींनी मी इथंच आहे, कुणाला खाज असेल त्यांनी इथं यावं असं म्हटलंय. दरम्यान, नागपुरात त्यांच्या रामकथेच्या कार्यक्रमातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी परिधान केलेल्या कुर्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीमा दिसून येतेय. तसंच मागे मोठ्या डिजिटल स्क्रीनवरही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे.