Tiger Attack | वाघाच्या हल्ल्यात मृत ढुमणे यांच्या कुटुंबाला १५ लाखांची मदत, पतीला वन विभागात नोकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Uddhav Thackeray

वाघाच्या हल्ल्यात मृत ढुमणे यांच्या कुटुंबाला १५ लाखांची मदत, पतीला वन विभागात नोकरी

नागपूर - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले आहे. मृत श्रीमती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच, त्यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे, तसेच त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत  घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

हेही वाचा: नागपुर : विद्यापीठ कर्मचारी जाणार संपावर

ताडोबा-अंधारी प्रकल्पातील व्याघ्र गणनेची तयारी करण्यासाठी वनरक्षक श्रीमती ढुमणे कर्तव्यावर असताना, वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ओढून नेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी प्रकाराबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मृत ढुमणे आणि त्यांच्या कुटुंबियाप्रति संवेदना प्रकट केली आहे. वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून ढुमणे यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच श्रीमती ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामवून घेण्याचेही निर्देशित केले आहे.

loading image
go to top