नागपुरात राहिलेला नूर मोहम्मद तालिबानमध्ये भरती झाला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नूर मोहम्मद

नागपुरात राहिलेला नूर मोहम्मद तालिबानमध्ये भरती झाला?

नागपूर: हातात रायफल धरलेल्या एका तालिबानी फायटरच्या फोटोमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे. हा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती नूर मोहोम्मद उर्फ अब्दुल हक असल्याचा संशय आहे. शहरात बेकयदा राहत असल्यामुळे जून महिन्यात नूर मोहोम्मदला मायदेशी अफगाणिस्तानात पाठवून देण्यात आले. शहरात बेकायद राहत असल्याचे आढळल्यानंतर त्याची मायदेशी रवानगी करण्यात आली. हा फोटो नूर मोहोम्मदचाच आहे का? यावर पोलीस काहीही बोलत नाहीयत. अफगाणिस्तानात गेल्यानंतर नूर मोहम्मद तालिबानमध्ये भरती झाल्याचा संशय आहे.

2010 मध्ये सहा महिन्याच्या पर्यटन व्हिसावर नूर मोहोम्मद भारतात आला होता. दिल्लीहून नागपुरला आल्यानंतर तो इथेच स्थायिक झाला. पैसे कमावण्यासाठी तो ब्लँकेट विकायचा. त्याशिवाय दुसरी बेकायदा कामेही करायचा. गुप्तचरयंत्रणा आणि पोलिसांना चकवा देऊन त्याने संपत्ती सुद्धा खरेदी केली होती.

सुरक्षा यंत्रणांनी जून महिन्यात नूर मोहम्मद तालिबान समर्थक असल्याचे जाहीर केले. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटसवरुन तो तालिबानचे समर्थन करत असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या धर्मालाविरोध करणाऱ्यांचा खात्मा करण्याची धमकी देणारा त्याचा व्हिडिओ मिळाला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलेय. पख्तून भाषेतील धमकी देणारा त्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ दुसऱ्या ग्रुप्समध्ये फिरल्यानंतर पोलिसांना त्याच्याबद्दल माहिती मिळाली.

हेही वाचा: नवरा अनैसर्गिक शरीरसंबंधांसाठी जबरदस्ती करतो, MNC मध्ये काम करणाऱ्या महिलेचा आरोप

पख्तून भाषेतील धमकी देणारा त्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ दुसऱ्या ग्रुप्समध्ये फिरल्यानंतर पोलिसांना त्याच्याबद्दल माहिती मिळाली. "त्यानंतर नूर मोहोम्मदचं काम, नेटवर्क याचा सखोल तपास करण्यात आला. पण त्याचा कुठल्याही बेकायदा कृत्यामध्ये सहभाग आढळला नाही" असे शहर पोलीस प्रमुख अमितेश कुमार म्हणाले. "बेकायदा स्थलांतरीतांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याऐवजी त्यांना त्यांच्या देशात पाठवून देणे, केव्हाही चांगला पर्याय आहे" असे अमितेश कुमार यांनी सांगितलं.

हेही वाचा: काबूल: भारताच्या प्रकल्पांबाबत तालिबानची महत्त्वाची भूमिका

सध्या व्हायरल झालेल्या फोटोमधील व्यक्ती नूर मोहोम्मदच असल्याचे पोलीस खात्रीने सांगत नाहीयत. "फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती नूर मोहम्मदच आहे किंवा अन्य कोणी हे सांगणे अजून कठीण आहे. मी नूर मोहम्मदची चौकशी केलीय. पण फोटोशी त्याचा चेहरा मिळत नाहीय" असे अमितेश कुमार म्हणाले.

Web Title: Did Afghan Deported From Nagpur Noor Mohammed Join Taliban

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nagpur