esakal | नेतृत्व बदलले, मतभेद कायम! राष्ट्रवादी, सेनेच्या विस्तार यात्रेला ब्रेक
sakal

बोलून बातमी शोधा

NCP-Shivsena

नेतृत्व बदलले, मतभेद कायम! राष्ट्रवादी, सेनेच्या विस्तार यात्रेला ब्रेक

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : महाविकास आघाडीत (mahavikas aghadi) तीन पक्ष सहभागी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आणि शिवसेनेच्या (shivsena) विस्तार यात्रेला ब्रेक लागला आहे. काही फुटकळ कार्यकर्त्यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठ आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नेतृत्वाच्या मर्यादाही आता स्पष्ट झाल्या आहेत. (differences in shivsena and ncp about nagpur municipal corporation election)

हेही वाचा: सेना, राष्ट्रवादींवर पटोलेंचे आरोप, नंतर घुमजाव; म्हणाले...

राष्ट्रवादीने नव्या दमाचे पेठ यांच्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे युवकांमध्ये जोश निर्माण होईल, मरगळ झटकली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, ती फोल ठरली. आधी जे कार्यकर्ते नियमित आंदोलने करून पक्षाला जिवंत ठेवत होती तेच चेहरे आताही कायम आहेत. ज्या काही कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीने प्रवेश दिला, त्यापैकी अनेकजण अडगळीतील आहेत. अनेकांची उपयोगिता काहीच नाही, अनेक कार्यकर्ते वादग्रस्त आहेत. मिरवणाऱ्या चेहऱ्यांमुळे शहरात खूप काही राजकीय उलथापालथ होईल असे सध्यातरी दिसत नाही. महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यावर यांपैकी किती जण टिकतील याचाही नेम नाही. पेठे यांना अध्यक्ष होऊन महिना उलटला असला तरी त्यांची कार्यकारिणी अद्याप तयार झालेली नाही. जुन्या व नव्यांचा समावेश करू असा दावा त्यांनी सुरवातीला केला होता. मात्र, त्यावर कोणाचे एकमत होताना दिसत नाही. त्यामुळे सध्यातरी एकला चलो रे असेच धोरण अवलंबिल्याशिवाय पेठे यांना दुसरा पर्याय नाही.

दुसरीकडे शिवसेनेलाही खूप काही साध्य होण्याऐवजी उलट आधीच्या लोकांची नाराजी ओढवून घ्यावी लागली. बसपाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांचा अपवाद वगळता शिवसेनेच्याही हाती फार काही लागल्याचे दिसून येत नाही. महापालिकेतील सत्ता तसेच राज्यात केव्हाही फेरबदल होण्याची शक्यता असल्याने भाजपचे कार्यकर्ते नाराज असले तरी पक्ष सोडण्याच्या मनःस्थितीत नाही. पक्ष बदलून खूप काही फायदा होईल असे त्यांना वाटत नाही. त्यामुळे काँग्रेसचेच कार्यकर्ते फोडण्याऐवजी सेना आणि राष्ट्रवादीसमोर दुसरा पर्याय नाही. या दोन्ही पक्षापेक्षा काँग्रेसची व्होट बँक नागपूरमध्ये आहेत. त्यामुळे काँग्रेसचे नेते बिनधास्त आहेत. त्यावर कोणी प्रतिक्रियासुद्धा व्यक्त करताना दिसत नाही. महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यावर पोळा फुटणारच असा विश्वास काँग्रेसला आहे.

loading image