नागपूर : रेल्वेत प्रवासासाठी सवलत मिळावी म्हणून दिव्यांगांना रांगेत लागून किंवा रेल्वे कार्यालयात जाऊन प्रक्रिया करण्याची गरज आता पडणार नाही. रेल्वेने प्रवास सवलतीची प्रक्रिया आणखी सुलभ केले असून त्यांना डिजिटल ओळखपत्र दिले जाणार आहे. .प्रवासी दिव्यांगांना शारीरिक प्रमाणपत्र नेहमी द्यावे लागत होते. डिजिटल ओळखपत्रामुळे त्यांचा हा त्रास थांबेल. रेल्वेने सवलतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ओळखपत्र प्रणालीचे संपूर्ण डिजिटायझेशन केले आहे. या डिजिटल ओळखपत्रात क्यूआर कोड असेल. तो इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)च्या ऑनलाइन बुकिंग प्रणालीत तसेच काउंटरवर तिकीट आरक्षणासाठी स्कॅन करता येईल. यामुळे दिव्यांग प्रवाशांना वारंवार कागदपत्रे सादर करावी लागणार नाही..कायमस्वरूपी डिजिटल ओळखरेल्वेच्या नव्या प्लॅटफॉर्मवर दिव्यांग स्वतःहून ऑनलाइन अर्ज व नूतनीकरण करू शकतात. या ओळखपत्रात एकदा माहिती भरल्यानंतर ते छेडछाड प्रतिरोधक व कायमस्वरूपी डिजिटल स्वरूपात वापरता येईल. याचा रेल्वेच्या डिजिटलमधील सेवेत समावेश आहे. लाखो दिव्यांग प्रवाशांचा प्रवास सोयीचा होणार असून https://divyangjanid.indianrail.gov.in या अधिकृत वेबसाईटवर दिव्यांगांना सोय उपलब्ध करून दिल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली..दिव्यांगांसाठी रेल्वेने ही एक चांगली सुविधा सुरू केली आहे. नागपूर विभागात दिव्यांगांच्या अर्जावर १०० टक्के डिजिटल ओळखपत्र वितरित करण्याचे काम सुरू आहे. याद्वारे गैरप्रकारालाही आळा बसेल.- अमन मित्तल, वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक- मध्य रेल्वे, नागपूर विभाग.दिव्यांगांना फायदेऑनलाईन अर्ज व नुतनीकरणाची सुविधा.शारीरिक सवलत प्रमाणपत्र बाळगण्याची गरज नाही.ऑनलाइन पडताळणी व वेगवान प्रक्रिया.पारदर्शक व सुरक्षित ओळख प्रणाली.क्यूआर कोडद्वारे सोयीस्कर वापर.नोंदणी प्रक्रिया कशी कराल?अधिकृत दिव्यांगजन पोर्टलवर नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करा.आपले राज्य व जवळचे रेल्वे स्थानक निवडा.दिव्यांग व रेल्वे सवलत प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करा.फोटो ओळखपत्र, जन्मतारखेचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो व पत्ता पुरावा.सर्व माहिती पूर्ण करून अर्ज सादर करा.अपूर्ण अर्ज ३० दिवसांत पूर्ण करून पुन्हा सादर करता येईल.अर्ज मंजूर झाल्यावर डिजिटल ओळखपत्र डाउनलोड करून घेता येईल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.