esakal | मित्रांनीच केला मित्राचा खून; मृतदेहाचे तुकडे करून पुरले खड्ड्यात
sakal

बोलून बातमी शोधा

मित्रांनीच केला मित्राचा खून; मृतदेह पुरला खड्ड्यात

मित्रांनीच केला मित्राचा खून; मृतदेह पुरला खड्ड्यात

sakal_logo
By
सतीश तुळसकर

उमरेड (जि. नागपूर) : शहरातील रेल्वे स्टेशनच्या मागच्या बाजूला वसलेल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या व भंगार विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आरोपीने मित्राची स्वतःच्या घरात हत्या केली. हत्येनंतर त्याचा मृतदेह लगतच्या आमराई परिसरातील भूमिगत विद्युत वाहिनीच्या खड्ड्यात पुरला. ही खळबळजनक घटना शुक्रवारी (ता. १०) पाच दिवसांनी उघडकीस आल्याने शहरात सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, घटनेतील आरोपीने ५ सप्टेंबर रोजी घरी पार्टी ठेवली होती. पार्टीमध्ये मृत ज्ञाना रूपराव शेंडे (वय २३, रा. रेल्वे स्टेशनच्या मागील झोपडपट्टी, उमरेड) याला आमंत्रित केले होते. यानंतर ज्ञाना घरी परत आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता. ६) उमरेड पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा: अत्याचारातून मुलगी झाली सात महिन्यांची गरोदर, मग...

मृत व आरोपी विजय ऊर्फ गोलू सुखराम मांडले व सुरजित ऊर्फ सुरज सुखराम मांडले हे नेहमी एकत्रित समूहाने भंगार गोळा केल्यानंतर विक्री करायचे. विक्रीतनू मिळालेले पैसे आपसात समसमान वाटप करायचे. त्याच पैशांची वाटनी करताना त्यांच्यात मतभेद झाले होते. याचा बदला घेण्याच्या उद्देशाने आरोपींनी रविवारी (ता. ५) दुपारी घरी पार्टी ठेवली होती. पार्टीत ज्ञानालाही आमंत्रित केले होते.

पार्टीच्या बहाण्याने ज्ञानाचा खून केल्यानंतर भूमिगत विद्युत वाहिनीच्या खड्ड्यातच मृतदेह पुरला. मृताच्या भावांनी, वहिनीने चौकशी केल्यानंतर ज्ञाना सायंकाळपर्यंत घरी न आल्याने शहराच्या आजूबाजूला तपास केला. मात्र, त्याचा पता लागला नाही. त्यामुळे सोमवारी उमरेड पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

ज्ञाना सापडत नसल्याने व शेजारी राहणारे आरोपी फरार असल्याने त्यांचावरील संशय वाढत गेला. आरोपीच्या घरात बघितले असता भिंतीवर चुन्याने सारवल्याच्या खुणा दिसल्या. भिंतीवर बाजूला रक्ताचे डाग दिसले. त्यामुळे पोलिसांना याची माहिती दिली. मात्र, पोलिसांनी तपासाचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे उमरेड पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला.

आमच्या नातेवाइकांचा खून झाला आहे. त्यांचा खून करणाऱ्या आरोपींना शोधून काढा अन्यथा आम्ही जनआंदोलन करू असा इशारा दिल्यानंतर उमरेड पोलिस स्टेशनचे निरीक्षक व उपविभागीय अधिकाऱ्यांनी नागपूरच्या प्रभारी पोलिस अधीक्षकांना पाचारण केले. यानंतर गुन्हे शाखा विभागाचे विजय जीतेवार यांच्यासह फॉरेन्सिक पथक घटनास्थळावर दाखल झाले.

हेही वाचा: मेट्रो भरती घोटाळ्यावर विजय वडेट्टीवार आक्रमक; म्हणाले...

तपास करून आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर घटनेची माहिती घेतली. आरोपींना सोबत घेऊन पोलिस फौजफाटा शुक्रवारी सायंकाळी घटनास्थळावर दाखल झाला. जेसीबीच्या साह्याने शव बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. संशयित आरोपी म्हणून चार जणांना ताब्यात घेतले आहेत. आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर उमरेड पोलिस ठाण्यामध्ये बरेचसे गुन्हे दाखल आहेत. परिसरामध्ये आरोपींची दहशत आहे. मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, पुन्हा दुसरा आरोपी फरार आहे.

loading image
go to top