

Antique Collection
sakal
नागपूर : शेती-वाडी, घर-दार, दाग-दागिने वारशाने मिळतात, हे सर्वश्रुत आहे, मात्र वारशात पुरातन वस्तू मिळतात आणि त्या सांभाळण्याची जबाबदारी येते, असे उदाहरण विरळाच. मात्र नागपूर येथील टेकडी रोडवर राहणारे दिलीप व्यास यांना थोड्याथोडक्या नव्हे ३० हजार वस्तू वारशात मिळाल्या आहेत आणि ते जीवाच्या असोशीने त्याचा सांभाळ करीत आहेत.