Buldhana Politics
Buldhana PoliticsSakal

Buldhana Politics : दिलीपकुमार सानंदा व एकनाथ शिंदे यांच्यात भेट

Maharashtra Politics : बुलडाणा काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष झाले, त्यानंतर खामगाव येथील काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
Published on

खामगाव : बुलडाणा काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात कमालीची अस्वस्थता पसरली असून अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत इतर पक्षात प्रवेश करत आहेत. याच श्रृंखलेत काँग्रेसचे माजी आमदार पक्षाला जय महाराष्‍ट्र करण्याच्या तयारीत आहेत. खामगाव येथील काँग्रेसचे माजी आमदार, काँग्रेसचे खंदे समर्थक व राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांचे जवळीक असलेले म्हणून ओळखल्या जाणारे दिलीपकुमार सानंदा हे पक्षाला जय महाराष्ट्र ठोकण्याच्या तयारीत आहे. त्यांनी मंगळवारी मुंबई येथे शिवसेनेचे मुख्यनेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे यावेळी बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे देखील उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com