बापरे! कोरोना कचरा उचलण्याचा दर १०० रुपये किलो; दररोज २ हजार ५०० किलो कचरा

बापरे! कोरोना कचरा उचलण्याचा दर १०० रुपये किलो; दररोज २ हजार ५०० किलो कचरा

नागपूर : कोरोनाबाधितांच्या रोजच्या निघणाऱ्या कचऱ्यात (Corona Biomedical waste) मागील दोन महिन्यात प्रचंड वाढ झाली आहे. गेल्यावर्षी ७०० ते ८०० किलो कचरा दर दिवसाला निघत होता. मात्र दुसऱ्या लाटेमध्ये २ हजार ५०० किलोंवर पोहोचला आहे. वाढत्या कोरोना बायोमेडिकल वेस्टमुळे शहरासमोर एक नवे आव्हान उभे ठाकले आहे. यामुळेच की, काय कोरोना जैविक कचरा उचलण्याचा भावही चांगलाच वधारला आहे. एक किलो कोरोना कचरा उचलण्यासाठी शंभर रुपये मोजावे लागतात. दिवसाला अडीच लाख रुपये कचरा उचलण्यासाठी द्यावे लागत असल्याची माहिती पुढे आली आहे. (Disposing corona waste is 100 rupees per kg)

बापरे! कोरोना कचरा उचलण्याचा दर १०० रुपये किलो; दररोज २ हजार ५०० किलो कचरा
तब्बल बारा हजार कामगारांवर उपासमारीची वेळ; ट्रान्सपोर्टेशन व्यवसाय अडचणीत

नागपूर जिल्ह्यात एप्रिल ते जून २०२० मध्ये दिवसाला १० ते २० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद व्हायची. जुलै महिन्यात ही संख्या वाढून १०० वर गेली. सप्टेंबर ऑक्टोंबर २०२० मध्ये १ हजार ५०० रुग्णसंख्येच्या दरम्यान गेली आहे. मात्र मार्च-एप्रिल २०२१ मध्ये ही संख्या ७ हजारांवर गेली. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच यांच्या कोरोना कचऱ्यातही प्रचंड वाढ झाली आहे. रुग्णाच्या वेगवेगळ्या शस्त्रक्रियेनंतर कॉटन, इंजेक्शन, आयव्ही बॉटल, प्लास्टर, बॅण्डेज, सिरिंज, पेशंटशी संपर्कात आलेल्या आणि उपचार करताना वापरलेली प्रत्येक वस्तू ‘कोरोना बायोमेडिकल वेस्ट’मध्ये मोडतात. विशेष असे की, सर्वाधिक कचरा हा मास्क, पीपीई कीट, हातमोजे यांचा तयार होतो. मार्च-एप्रिल २०२१ मध्ये दिवसाला अडीच हजार किलो कचरा निघत होता. मेडिकल प्रशासन दर महिन्याला सुमारे पाऊणेदोन लाख रुपये कोरोना कचरा उचलण्यासाठी देते करते. हीच स्थिती मेयोचीही आहे.

पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून

पर्यावरणाची हानी होणार नाही, यामुळे कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन गरजेचे आहे. त्या दृष्टीने ‘बायो-मेडिकल वेस्ट हॅण्डलिंग रुल्स’चे अतिशय काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून यावर विशेष लक्ष ठेवले जाते. या जैविक कचऱ्याची उचल करून त्याचे विघटन करण्याची जबाबदारी सद्या सुपर हायजेनिक डिस्पोजल कंपनीकडे आहे. मार्च-एप्रिल २०२१ महिन्यात मेयो, मेडिकलसह सर्व खासगी कोरोनाबाधित रुग्णांशी संबंधित रोजचे बायोमेडिकल वेस्ट २ हजार ५०० किलो निघतो. १०० रुपये किलोच्या भावाने हा कचरा उचलण्यात येतो. याशिवाय रुग्णालयातील इतर जैविक कचरा उचलण्यासाठी वेगळा खर्च करावा लागतो. तो खर्च खाटांप्रमाणे आहे.

अशी लावली जाते विल्हेवाट

‘सुपर हायजेनिक डिस्पोजल कंपनीचे भांडेवाडी डंपिंग स्टेशन येथे एक केंद्र आहे. येथे हॉस्पिटलमधून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या कचऱ्याचे संकलन केले जाते. विशिष्ट यंत्राच्या माध्यमातून १२०० डिग्री तापमानात या कोरोना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येते. दर तासाला १०० किलोग्रॅम कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सोय आहे. ‘बायो-मेडिकल वेस्ट’ची विल्हेवाट लावण्याचे कठोर नियम पाळले जातात. कोरोना बायो मेडिकल वेस्टमधून संसर्ग होऊ नये यासाठी कचरा संकलनासह विल्हेवाट होईपर्यंत लक्ष देण्यात येते. यासाठी स्वतंत्र वाहने आहेत. पीपीई कीट घातलेले कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कोरोना कचरा भांडेवाडीत पोहचवून तो यंत्राद्वारे जाळला जातो.

बापरे! कोरोना कचरा उचलण्याचा दर १०० रुपये किलो; दररोज २ हजार ५०० किलो कचरा
आयकर अधिकाऱ्याचा महिला डॉक्टरवर बलात्कार; व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी

विलगीकरणातील कचरा उचलणे अशक्य

विशेष धक्कादायक म्हणजे, गृहविलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या घरोघरी जाऊन कचरा उचलण्याचे आव्हान कंपनीलाही पेलवता आले नाही. घरी निर्माण झालेला कचरा हा कचरागाडीतूनच गेला आहे. हा कचरा शहरासाठी धोक्याची घंटा आहे. मात्र याकडे ना महापालिका प्रशासनाचे लक्ष गेले ना जिल्हा प्रशासनाचे. हा कचरा धोकादायक ठरला असल्याचे जाणकार सांगतात.

(Disposing corona waste is 100 rupees per kg)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com