बाह्यरुग्ण विभागातील डॉक्टरांच्या खुर्च्या रिकाम्या | Nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाह्यरुग्ण विभागातील डॉक्टरांच्या खुर्च्या रिकाम्या

नागपूर : बाह्यरुग्ण विभागातील डॉक्टरांच्या खुर्च्या रिकाम्या

नागपूर : यवतमाळ येथील एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या अशोक पाल या विद्यार्थ्याची हत्या झाली. याचा निषेध करण्यासाठी मेडिकल आणि मेयोत निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. शनिवारी सकाळी ८ वाजता मेडिकल २७० तर मेयोतील १७० निवासी डॉक्टरांनी हातातील स्टेथेस्कोप खाली ठेवला. यामुळे तासांतच येथील रुग्णसेवा विस्कळित झाली. बाह्यरुग्ण विभागातील सर्व डॉक्टरांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण ताटकळत होते.

शुक्रवारी सकाळीच मेडिकल मार्डचे अध्यक्ष डॉ. संजय बन्सल यांनी मेडिकल प्रशासनाला निवेदन सादर केले. त्यानुसार मार्डने संप पुकारला. यवतमाळ येथील भावी डॉक्टरची हत्या करण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली नाही. यामुळे संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांनी आरोपीला अटक करावी तसेच पाल यांच्या कुटुंबीयांना ५० लाखाची मदत करावी या मागणीसाठी संप पुकारला.

हेही वाचा: प्रशिक्षणावेळी चंद्रकांत कुंभार यांनी बनविलेला सहा फुटी फ्लाॅवर पाॅट

बाह्यरुग्ण विभागात आलेले रुग्ण आल्या पावली परत गेले. मेडिकल प्रशासनाने इतर डॉक्टरांना बाह्यरुग्ण विभागात कर्तव्यावर ठेवले, परंतु खुर्चीत डॉक्टर हजर नसल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाइकांनी केली.

"शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी निवासी डॉक्टर आहेत. परंतु त्यांनाच मारहाण केली जाते. भावी डॉक्टर असलेल्या अशोक पाल या विद्यार्थ्याचा हत्या करण्यात आली त्या आरोपीला अटक करावी. तसेच कुटुंबीयांना ५० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. तसेच वॉर्डात सुरक्षारक्षक तैनात ठेवण्यात यावी."

- डॉ. सजल बन्सल, अध्यक्ष, मार्ड

loading image
go to top