प्रशिक्षणावेळी चंद्रकांत कुंभार यांनी बनविलेला सहा फुटी फ्लाॅवर पाॅट | Nipani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशिक्षणावेळी चंद्रकांत कुंभार यांनी बनविलेला सहा फुटी फ्लाॅवर पाॅट

प्रशिक्षणावेळी चंद्रकांत कुंभार यांनी बनविलेला सहा फुटी फ्लाॅवर पाॅट

निपाणी : येथील कुंभार गल्लीतील चंद्रकांत कुंभार यांनी सहा फुट उंचीचा फ्लाॅवर पाॅट बनविला आहे. कुंभारकाम करत असताना पहिल्याच प्रयत्नात त्यांना ही कलाकृती करण्यात यश आले आहे. त्यांनी या अगोदर बंगळूर, धारवाड येथील प्रदर्शनातही सहभाग नोंदवून आपली कला सादर केली आहे.

कुंभार यांनी खानापूरमधील सेंट्रल व्हिलेज पौट्री इंडस्ट्रीज (सीपीव्हीआय) येथे फ्लाॅवर पाॅट बनविला आहे. तो या कार्यशाळेतच राहणार आहे. प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून त्यांनी केवळ तेरेकोट मातीपासून या फ्लाॅवर पाॅटला आकार दिला.

हेही वाचा: बारामती सहकारी बँकेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले

कुंभार हे मातीच्या वस्तूंसह लोटकी तयार करतात. त्यांना हा फ्लाॅवर पाॅट तयार करण्यासाठी कुंभार यांना सहा दिवसाचा कालावधी लागला. अत्याधुनिक मशीनवर त्याचे ओझे पेलत नसल्याने जुन्या पद्धतीच्या काठीवर फिरविणारया चाकावर त्यास आकार दिला. त्यामुळे नागरिकांना त्याचे कुतूहल वाटत आहे. भाजणीसाठी काही रक्कम त्यांना खर्च करावी लागली. अत्यंत आकर्षक झालेला हा फ्लाॅवर पाॅट दीर्घकाळ खानापूरच्या कार्यशाळेत ठेवण्यात येणार आहे.

येत्या दिवाळीत निपाणीही प्रदर्शन

येत्या दिवाळीत निपाणी शहरातही मातीच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन भरविण्याचा मानस आहे. या प्रदर्शनात मातीचे आकाशकंदील, पणत्या, दिव्यांसह विविध वस्तू पाहण्यास मिळणार आहेत. त्यामुळे विविध कलाकृती या प्रदर्शनात दिसणार आहेत.

हेही वाचा: अमरावती: बाळासाहेब ठाकरे असते तर थोबाडीत लगावली असती- चंद्रकांत पाटील

"आपल्याकडील कला सादर करण्याची संधी खानापूरच्या कार्यशाळेत मिळाली. त्याचा उपयोग करून हा सहा फुटी फ्लाॅवर पाॅट बनविला. त्याचे अनेकांनी कौतूक केल्याने समाधान वाटत आहे. यापुढेही कुंभार कलेच्या माध्यमातून नवनवीन वस्तू साकारण्याचा संकल्प केला आहे."

-चंद्रकांत कुंभार,निपाणी

loading image
go to top