कौतुकास्पद कामगिरी! जीवाची जोखीम स्वीकारून 'ते' करताहेत कोरोना रुग्णांची मदत

कौतुकास्पद कामगिरी! जीवाची जोखीम स्वीकारून 'ते' करताहेत कोरोना रुग्णांची मदत

नागपूर :कोरोना बाधितांचा (Coronavirus) उंचावलेला ग्राफ, वाढलेले मृत्यू, त्यात रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याचे आरोपही झाले. या निराशाजनक आणि संतापाच्या परिस्थीतीत राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) कार्यक्रम अधिकारी डॉ. सुशांत चिमणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांच्या समुपदेशनाचे ( Counselling) कार्य केले. वर्षभरापासून अगदी जीवाची जोखीम स्वीकारून नातेवाईकांचा रुग्णसोबत संवाद घडवून आणण्याचे कार्य ते करीत आहेत. त्यांच्या कार्यामुळे रुग्णांची हिंमत वाढण्यासह कुटुंबांनाही दिलासा मिळत आहे. (Doctor from Nagpur serving corona patients and relatives)

कौतुकास्पद कामगिरी! जीवाची जोखीम स्वीकारून 'ते' करताहेत कोरोना रुग्णांची मदत
International Museum Day 2021: भारतातील 'या' म्युझियम्समध्ये आहेत आश्चर्यचकित करणाऱ्या प्राचीन वस्तू

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला. अगदी सुरुवातीला त्यावर केवळ सरकारी रुग्णालयात उपचार होत असल्याने मेयो आणि मेडिकलला रुग्णसंख्या वाढू लागली. यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांद्वारे राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांची मदत घेण्याचे ठरले. यात पीडब्ल्यूएस महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुशांत चिमणकर, प्रा. लांडगे आणि रत्नदीप कांबळे या विद्यार्थ्याची निवड झाली. यापैकी डॉ. चिमणकर यांची कपिलनगर पोलिस स्टेशनतर्गंत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेयो) रुग्णालयात समुपदेशनासाठी ड्युटी लागली. काम करीत असताना रुग्णावर व्यवस्थित उपचार होत नसल्याचे सांगून नातेवाईक गोंधळ घालत असतात.

अशावेळी त्यांचा थेट रुग्णांशी संवाद साधून देत, त्यांचा राग शांत करणे, त्यांनाही समजावून सांगत परिस्थितीतीची जाणीव करून देण्याचे काम यशस्वीपणे डॉ. चिमणकर यांनी पार पाडले. दिवसा महाविद्यालय तर रात्री ते रुग्ण व त्यांचा नातेवईकांचे निशुल्क समुपदेशन करीत. आजही ते समुपदेशनाचे नेटाने करीत आहेत. केवळ इतकेच नव्हे तर महाविद्यालयातील कामे व समुपदेशन बंद असताना त्यांनी स्वस्थ न बसता वृद्ध आणि अपंगांना लसीकरण केंद्रावर पोहचवून,नोंदणीसाठी मदत करण्याचा उद्देशाने महाविद्यालयातील एनएसएसच्या ५० विद्यार्थ्यांची टीम तयार केली. त्यांच्या साहाय्याने दुचाकी वाहनांवरून अपंग व वृद्धांना लसीकरण केंद्रावर नेण्याचे काम ते करतात.

कोरोनावर मत करून केले काम

मेयोमध्ये समुपदेशनाने काम करीत असताना डॉ. सुशांत चिमणकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला. २४ दिवसात त्यावर मात करीत, त्यांनी पुन्हा या कामास सुरुवात केली. याशिवाय मेडिकलमध्येही त्यांनी आपली निःशुल्क सेवा दिली.

कौतुकास्पद कामगिरी! जीवाची जोखीम स्वीकारून 'ते' करताहेत कोरोना रुग्णांची मदत
तुम्हालाही बेस्ट लाईफ पार्टनर व्हायचंय का? मग कामसूत्रात सांगितलेल्या या ४ गोष्टी नेहमी ठेवा लक्षात
राष्ट्रीय सेवा योजनेत तन मन धनाने समाजकार्य करण्याची इच्छा होती. त्यामुळे हे कार्य करण्याचे स्वीकारले. आणि ते आजही करतो आहे.
डॉ. सुशांत चिमणकर,कार्यक्रम अधिकारी, पी.डब्ल्यू.एस. महाविद्यालय

(Doctor from Nagpur serving corona patients and relatives)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com