esakal | बाप रे! नागपुरात कुत्र्याला कोरोना?... कुत्र्याला खोकला झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण..
sakal

बोलून बातमी शोधा

dog has cough in south Nagpur people have fear of corona

दक्षिण नागपुरातील एका वस्तीतील नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा नेहमीचाच त्रास आहे. आता तर अनेकांनी कुत्र्यांना गांभार्याने घेणेही सोडले आहे. पण आज येथील रहिवाश्यांना एका कुत्र्याने अक्षरशः घाबरवून सोडले आहे.

बाप रे! नागपुरात कुत्र्याला कोरोना?... कुत्र्याला खोकला झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण..

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर: नागपुरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रत्येक जण कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्या घरी आहे. त्यात प्रशासनाने लावलेल्या दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र दक्षिण नागपुरातील एका घटनेमुळे लोकांच्या मनात प्रचंड धडकी भरली आहे.  
दक्षिण नागपुरातील एका वस्तीतील नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा नेहमीचाच त्रास आहे. आता तर अनेकांनी कुत्र्यांना गांभार्याने घेणेही सोडले आहे. पण आज येथील रहिवाश्यांना एका कुत्र्याने अक्षरशः घाबरवून सोडले आहे. महापालिकेच्या हनुमाननगर झोनअंतर्गत चक्रधरनगरमध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे दिसून येतात. अनेकदा तक्रारी करूनही पशुप्रेमींच्या दबावामुळे महापालिकेकडून नेहमीच मोकाट कुत्र्यांवर कारवाई टाळली जाते. त्यामुळे नागरिकही मोकाट कुत्र्यांबाबत तक्रारी करीत नाही.  

हेही वाचा- डॉन संतोष आंबेकरला मिळाला हा मोठा दिलासा, वाचा काय झाले ते... 

कुत्र्याला झाला खोकला

दोन दिवसांपासून चक्रधरनगरातील एका भागात मोकाट कुत्रा खोकलताना नागरिकांना दिसून आला. त्यामुळे नागरिकांत आरोग्याच्या दृष्टीने भीती पसरली. अखेर काही नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. परिसरातील नागरिकांनी महापालिकेला केलेल्या तक्रारीत कुत्र्याला खोकला झाला असल्याचे नमुद केले. मोकाट कुत्र्यांवर कारवाईसाठी घाबरत असलेल्या महापालिकेच्या पशुवैद्यक विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही तक्रारीचे गांभीर्य ओळखले. त्यांनी आज सकाळी चक्रधरनगर गाठून नेमक्‍या खोकला झालेल्या कुत्र्याला पकडण्याची मोहिम सुरू केली.

नागरिकांची उडाली होती झोप 

या कुत्र्याला पकडताना कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. परंतु अखेर या कुत्र्याला जाळ्यात पकडण्यात त्यांना यश आले. कुत्र्याला पकडून त्यांनी वाहनातून उपचारासाठी नेले आणि दोन दिवसांपासून दहशतीत असलेल्या चक्रधरनगरवासियांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. कोरोनामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्यात कुत्र्यांच्या खोकल्यामुळे दोन दिवसांपासून येथील नागरिकांची झोप उडाली होती. 

म्हणून खोकला झाला असावा 

दोन दिवसांपासून झालेल्या पावसात भिजल्याने कुत्र्याला खोकला झाला असावा, असा तर्क काही नागरिकांनी काढला. थंडीमुळे कुत्र्याला सर्दी किंवा खोकला होतो, असे एका पशुवैद्यक तज्ज्ञाने नमुद केले. 

अधिक माहितीसाठी - दारूच्या नशेत लहान्याने उगारला आई-वडिलांवर हात मोठा संतापला आणि... 

कुत्र्यांना कोरोना झाल्याचे उदाहरण नाही
कुत्र्यांना कोव्हीड झाल्याचे कुठलेही उदाहरण नाही. त्यामुळे कुत्र्यांपासून नागरिकांना कोव्हीड होईल, अशी स्थिती नाही. नागरिकांनी घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. 
- डॉ. गजेंद्र महल्ले, 
पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top