सापळा तयार केला बिबट्यासाठी अन् अडकले श्वान; अजूनही बिबट्या शोध सुरु

सापळा तयार केला बिबट्यासाठी अन् अडकले श्वान; अजूनही बिबट्या शोध सुरु

नागपूर : बर्डी परिसरातील (Sitabuldi Market) महाराजबाग प्राणिसंग्रहालय (Maharajbag zoo Nagpur) परिसर, दुपारी अडीच वाजताची वेळ, वन विभागाचे कर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्याच्या (Leopard in Nagpur) परिसराच्या पाहणीसाठी आले, डुकराची शिकार केलेल्या ठिकाणावर ते बसले होते. तेवढ्यात ज्या पिंजऱ्यात बिबट्याचे भक्ष्य म्हणून बकरी ठेवली त्या पिंजऱ्याचे दार खाली पडल्याचे एका कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. (dogs trapped in cage instead on leopard in Nagpur)

सापळा तयार केला बिबट्यासाठी अन् अडकले श्वान; अजूनही बिबट्या शोध सुरु
कचऱ्यातून महापालिकेला मिळणार तब्बल ५ कोटी; ई-कचरा येणार कामी

दार खाली आल्याने बिबट्या जेरबंद झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला. कर्मचारी सावध पवित्रा घेत पिंजऱ्याच्या दिशेने निघाले. पिंजऱ्याजवळ पोचल्यानंतर त्यांचा भ्रमनिरास झाला आणि एकच हशा पिकला. कारण, त्या पिंजऱ्यात बिबट नव्हे तर दोन श्वान अडकली होती.

महाराजबागेजवळील तालुका कृषी अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या शेजारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी डुकराची शिकार केलेल्या परिसरात मंगळवारी वन विभागाने पिंजरे लावले आहेत. बिबट्या शहराच्या मध्यवस्तीपर्यंत आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे त्याला जेरबंद करण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार चार पिंजरे विविध ठिकाणी लावण्यात आले होते. त्यातील एका पिंजऱ्याचे दार पडलेले असल्याचे दिसल्याने बिबट्या पकडला गेला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

सापळा तयार केला बिबट्यासाठी अन् अडकले श्वान; अजूनही बिबट्या शोध सुरु
परीक्षा रद्द पण प्रात्यक्षिक होणारच; सीबीएसई प्रादेशिक विभागाचे आदेश

ते पिंजऱ्याच्या दिशेने निघाले. तेव्हा पिंजऱ्याच्या शेजारीही पलीकडच्या बाजूने पायांची हालचाल दिसत होती. त्यामुळे दबक्या पावलानं सुरक्षिततेची काळजी घेत पिंजऱ्याजवळ पोचले. मात्र, त्या पिंजऱ्यात कुत्रे बंदीस्त झाल्याचे दिसले. वन कर्मचाऱ्यांनी दार उघडताच कुत्र्यांनी मिळेल त्या दिशेने धूम ठोकली. कर्मचाऱ्यांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला. दरम्यान, पिंजऱ्यात ठेवलेली बकरी कुत्र्यांच्या भीतीने जोराने ओरडत होती. कुत्रे पळताच तिचे ओरडणे बंद झाले. त्याचवेळी कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी बकरीसाठी चारा आणि पाणी दिले.

(dogs trapped in cage instead on leopard in Nagpur)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com