Nagpur: डॉ. आंबेडकरांच्या नावे पाली विद्यापीठ स्थापन करा

उच्च न्यायालयात याचिका : केंद्र व राज्याला मागितले उत्तर
डॉ.आंबेडकर
डॉ.आंबेडकरsakal
Updated on

नागपूर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाली विद्यापीठाची स्थापना महाराष्ट्रात, प्रामुख्याने नागपूरमध्ये करण्याची विनंती करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर न्यायालयाने केंद्र व राज्य शासनाला नोटीस बजावत चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. प्रा. भालचंद्र खांडेकर यांनी ही याचिका दाखल केली.

या प्रकरणी न्यायमूर्ती अतुल चांदुरकर आणि न्यायमूर्ती महेंद्र चांदवानी यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, पाली ही देशातील सगळ्यात जुन्या भाषांपैकी एक असून तिला सुमारे अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. गौतम बुद्धांनी अध्यात्म आणि त्यांच्या विचारधारेचा प्रचार करण्यासाठी प्रामुख्याने याच भाषेचा उपयोग केला.

डॉ.आंबेडकर
Pune Lok Sabha Bypoll Election : पुण्यात लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मोठ्या घडामोडी; भाजपची ३ नावं समोर

पुढे सम्राट अशोकच्या काळात या भाषेचा वापर देशभर झाला. आज देशात पन्नासहून अधिक विद्यापीठांमध्ये ही भाषा शिकविली जाते. त्यामुळे, यासाठी स्वतंत्र्य विद्यापीठ स्थापन करण्याची आवश्‍यकता आहे. तसेच, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) मेन्स परीक्षेतील एक पर्यायी विषय(ऑप्शन) म्हणून पाली भाषा या विषयाला मान्यता द्यावी, अशीही विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

डॉ.आंबेडकर
Mumbai Crime : अंधेरीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट गुन्हे शाखेकडून उध्वस्त; महिलांची सुटका

या मागण्यांच्या अनुषंगाने २०१६ मध्ये नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने केंद्र शासनाच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आदेशही दिले होते.

याचा अनेकदा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे न्यायालयाने या विभागाला संबंधित निर्णय घेण्याचे आदेश द्यावेत. तसेच, हा निर्णय घेऊन कालबद्ध पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्याचेही आदेश द्यावे, अशी विनंती याचिकेत केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. शैलेश नारनवरे यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Dr Babasaheb Ambedkar name for Miraj Medical College and Hospital
Dr. Babasaheb Ambedkar name for Miraj Panchayat building
Activists Install Dr Babasaheb Ambedkar Signboard
Dr Babasaheb Ambedkar Brass Statue Stolen from Buddha Vihar in Khaparkheda Police Begin Search for Accused
Marathi News Esakal
www.esakal.com