
Keshav Hedgewar
esakal
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना भारतरत्न सन्मान द्या, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्राद्वारे केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपला शताब्दी महोत्सव २०२५ च्या विजयादशमीपासून २०२६ पर्यंत साजरा करणार आहे. या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.