
Dr. Mohan Bhagwat addressing Somnath Jyotirlinga Maha Rudra Puja at Mankapur Stadium, stressing spiritual power for world welfare.
Sakal
नागपूर: भगवान शिव आज दशांश रूपात येथे अवतरित आहेत. त्यांचा पूर्णावतार पाहण्याची शक्ती आपल्यात नाही. पण त्यांचा सेवेचा आदर्श प्रत्येकाने अंगिकारावा. भारताकडे आशाळभूत नजरेने पाहत असलेल्या जगाचे कल्याण करण्याची शक्ती साधनेतून आत्मसात करा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिला. मानकापूर इनडोअर स्टेडियम येथे बुधवारी सोमनाथ ज्योतिर्लिंग रूद्रपूजनाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री श्री रविशंकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.