Samruddhi Mahamarg : समृद्धीवर दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांनो सावधान!

जावे लागणार तुरुंगात; आरटीओकडून रात्रीची तपास मोहीम
drunken drivers on Samruddhi highway
drunken drivers on Samruddhi highway sakal

Nagpur : समृद्धी महामार्गावर मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची आता खैर नाही. अशांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून नागपूर ‘इंटरचेंजवर’ रोज संध्याकाळी ७ ते रात्री १२ दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर १ जुलै रोजी विदर्भ ट्रॅव्हल्सचा अपघात होऊन २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेत एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सचा चालक शेख दानिश हा वाहन चालविताना दारू पिऊन असल्याचे समोर आले आहे.

अपघाताच्या वेळी त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोलची मर्यादा ही कायदेशीर मान्यतेपेक्षा जास्त होती, असा अहवाल अमरावती येथील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेने दिला आहे. या अहवालानंतर प्रादेशिक परिवहन विभाग खडबडून जागा झाला आहे.

नागपूर आणि कारंजा या दोन ठिकाणी समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी ‘इंटरचेंज’आहे. या दोन्ही पॉइंटवर प्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी पथक तैनात केले आहे. ट्रॅव्हल्सचे फिटनेस, टायरची हवा, आपत्कालीन दरवाजा या बाबी तपासण्यासोबतच आता ट्रॅव्हल्स चालकाची मद्य तपासणी सुद्धा केली जात आहे.

ब्रेथ ॲनलायझरने तपासणी

प्रादेशिक परिवहन व वाहतूक विभागाच्या माध्यमातून रोज संध्याकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या ट्रॅव्हल्सची तपासणी ‘ब्रेथ ॲनलायजर’च्या माध्यमातून केली जात आहे. मद्यपी चालकाला तुरुंगवास होऊ शकतो, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली.

नागपूर आणि कारंजा या दोन फिक्स पॉइंटवर रात्रीच्या वेळी ट्रॅव्हल्स चालकांची मद्य तपासणी केली जात आहे. रात्रीच्या वेळी ट्रॅव्हल्सचे संचालन समृद्धीवर जास्त आहे. त्यामुळे ही मोहीम रात्रीला राबविण्यात येत आहे. चालक दोषी आढळला तर त्याच्यावर गुन्हा नोंदवून कारागृहात रवानगी करण्याची तरतूद आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com