सततच्या नुकसानीमुळे नरखेड तालुक्यातील तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या

खासगी कर्जदार पैशासाठी तकादा लावत असल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले
sucide case nagpur
sucide case nagpursakal
Summary

खासगी कर्जदार पैशासाठी तकादा लावत असल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले

अंबाडा : नरखेड तालुक्यातील थडीपवनी येथील शेतकरी वसंत शामराव मातकर वय वर्ष 48 रा. थडीपवनी यानी शनिवारी सकाळी 8 च्या सुमारास शेतातील विहरित उडी घेऊन आत्महत्या केली.(sucide) वसंत मातकर यांनी दोन वर्षापूर्वी शेती विकून आलेल्या पैशातून कर्ज फेडले व शिल्लक असलेल्या रमेतून दोन एकर शेती विकत घेतली.

घेतलेल्या शेतीची विक्री याचवर्षी होती. घेतलेल्या शेतीची विक्री असल्यामुळे पैश्याची अडचण व सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान. त्यामुळे शेतीची विक्री करायची कशी पैसे आणायचे कुठून तारखेपर्यंत पैशाची जुळवाजुळव होऊ शकली नाही. 20 जानेवारीला शेतीची विक्री होती. 10 लक्ष रुपयांमध्ये दोन एकर शेती(farm and loan) विकत घेतली होती 6 लक्ष रुपये देऊन 4 लक्ष देणे बाकी होते.

sucide case nagpur
एसटीच्या संपकऱ्यांवर कारवाईची धार तेज; बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या 3558

परंतु त्यांच्याकडे पैशायची जुळवा जुवल होत नसल्यामुळे व इतरांना दिलेले पैसे परत मिळत नसल्यामुळे व शेताती पीक पावसामुळे खराब झाल्यामुळे शेतकरी वसंत मातकर यांनी शनिवारी सकाळी स्वतःच्या शेताती विहरित उडी घेऊन आपले जीवन संपवले. शेतकऱ्याने शेतीसाठी खासगी कर्ज घेतले होते. खासगी कर्जदार पैशासाठी तकादा लावत असल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचल्याचे सांगण्यात येत आहे.

वसंत मातकर शुक्रवारी सायंकाळी 6 वाजे पासून घरातून बाहेर पडला असता रात्री 8 वाजले तरी ते परत न आल्याने त्याचा घरच्यांनी शोध घेणे सुरू केले असता त्याना सर्वत्र शोध घेतला परंतु ते सापडले नाही. शनिवारी 8 च्या सुमारास शेतातील विहरी जवळ टावेल आढळला. विहरित पाहले असता त्यांचा मृतदेह(dead body ) विहिरीत आढळला.

sucide case nagpur
Davos Agenda 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी संबोधित करणार

मृत देह विहरितून बाहेर काढण्यात आलं वे घटनेची माहिती जलाल खेडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथील शववीच्छेदन गृहात (SUCIDE) पाठवण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार हरीचंद्र गावडे व बिट जमादार मोरेश्वर चलपे, दिनेश हिवसे करीत आहे.

sucide case nagpur
गोव्यात संभाजी ब्रिगेडचा भाजपविरोधात शड्डू; लढवणार निवडणूक

दोन ते तीन दिवसापूर्वी मला माझा पुतण्या वसंता मातकर भेटला त्याने नवीन शेत विकत घेतल्याची माहिती दिली परंतु विक्री व्हायची आहे असेही त्यांने सांगितले अनेकांना हातउसने पैसे दिल्याचेही बोलला परंतु 20 तारखेला विक्री आहे हातउसने दिलेले पैसे अजूनही मिळाले नाही काय करावे सुचत नाही असे माझ्याजवळ बोलला पैसे वेळेवर मिळत नसल्यामुळे हा नैर्णय घेतला असावा असे मला वाटते

- मोहन मातकर. सामाजिक कार्यकर्ते, थडीपवनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com