Samrat Nagorao Patankar Award Announced
sakal
सकाळ वृत्तसेवा
नागपूर,: वडिलांच्या निधनाने घर शोकसागरात बुडाले. मात्र, सहाव्याच दिवशी वडिलांनीच ठरवलेली कामठीतील मैफल प्रकाशनाथ पाटणकरांनी सजवली. दुखवट्याची झालर अंगावर घेत, वडिलांचा लोकगायनाचा सूर त्यांनी पुढे नेला. ही आठवण सांगताना प्रकाशनाथ यांचे डोळे डबडबले. आंबेडकरी चळवळीतील गीतांना आवाज देत सामाजिक परिवर्तनाचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचविणारे प्रसिद्ध लोकगायक व प्रबोधनकार प्रकाशनाथ पाटणकर यांना रिपब्लिकन मुव्हमेंटतर्फे ‘सम्राट नागोराव पाटणकर जीवनगौरव