esakal | राष्ट्रवादीचा कारभार मोठा असल्याने समन्वयाचा अभाव; मात्र, गटबाजी नाही
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीचा कारभार मोठा असल्याने समन्वयाचा अभाव; मात्र, गटबाजी नाही

राष्ट्रवादीचा कारभार मोठा असल्याने समन्वयाचा अभाव; मात्र, गटबाजी नाही

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचा (Nationalist Congress) कारभार मोठा आहे. त्यामुळे थोडाफार समन्वयाचा अभाव राहू शकतो. मात्र, पक्षात गटबाजी मुळीच नाही (There is no factionalism in the party), असा दावा नवनियुक्त शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे (City President Duneshwar Pethe) यांनी पत्रकार परिषदेत केला. (Duneshwar-Pethe-said-that-there-is-no-factionalism-in-the-NCP)

अध्यक्षांच्या पहिल्या पत्रकार परिषदेला झाडून शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, माजी शहराध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहीरकर दिसत नसल्याने त्यांच्यावर वेगळी जबाबदाऱ्या आहेत असे सांगून पेठे यांनी वेळ मारून नेली. आता लवकरच शहराची कार्यकारिणी जाहीर करून त्यात नव्या व जुन्यांचा समावेश करून समतोल साधला जाईल. खासदार प्रफुल पटेल आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याच मार्गदर्शन पक्षाचे काम सुरू राहणार असल्याचे पेठे यांनी सांगितले.

हेही वाचा: ...म्हणून महाविकासआघाडीतून बाहेर पडा आणि महायुतीचे सरकार स्थापन करा

राज्यात महाविकासआघाडीचे सरकार असले तरी प्रमुख नेत्यांनी महापालिका निवडणुकीची स्वबळावर तयारी करण्याचे सांगितले आहे. प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतर जे व्हायचे होईल. आम्ही सर्व १५१ वॉर्डाच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करणार आहोत. यासाठी ‘अकरा युथ एक बूथ’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. पुढील एक महिन्यात सर्व वॉर्डात अध्यक्ष व बूथ प्रमुखांची नियुक्ती केली जाईल.

याशिवाय विभागीय अध्यक्ष, फ्रंटल व सेल प्रमुखांच्याही नियुक्त्या केल्या जाईल. महापालिकेच्या निवडणुकीत ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. मागील निवडणुकीत भाजपने आपल्या सोयीसाठी प्रचंड मोठे प्रभाग केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले. यावेळी एक किंवा दोन वॉर्डाचा प्रभाग राहणार आहे. त्यामुळे निश्चितच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या वाढेल असा विश्वासही पेठे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: किती ही हिंमत! वनविभागाच्या जमिनीवरच पाडले प्लॉट

पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील, शब्बीर विद्रोही, प्रदेश सरचिटणीस आभा पांडे, माजी आमदार प्रकाश गजभिये, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, युवा नेते सलिल देशमुख, ज्येष्ठ नेते वेदप्रकाश आर्य, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, महिलाध्यक्ष लक्ष्मी सावरकर, प्रशांत पवार, शैलेंद्र तिवारी आदी उपस्थित होते.

(Duneshwar-Pethe-said-that-there-is-no-factionalism-in-the-NCP)

loading image
go to top