esakal | ...म्हणून महाविकासआघाडीतून बाहेर पडा आणि महायुतीचे सरकार स्थापन करा
sakal

बोलून बातमी शोधा

...म्हणून महाविकासआघाडीतून बाहेर पडा आणि महायुतीचे सरकार स्थापन करा

...म्हणून महाविकासआघाडीतून बाहेर पडा आणि महायुतीचे सरकार स्थापन करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakare) यांनी हिंदू राष्ट्राचे स्वप्न बघितले. यासाठी त्यांनी भाजपला सोबत घेतले. मात्र, सत्ता स्थापनेच्यावेळी मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत बिनसले. यामुळे शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले. शिवसेनेला बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर महाविकासआघाडीमधून बाहेर पडावे (ShivSena should get out of Mahavikasaghadi), असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Union Minister of State Ramdas Athavale) यांनी केले. (Ramdas-Athavale's-appeal-to-the-Chief-Minister-to-form-government-with-Bjp)

रामदास आठवले यांची पत्रकार परिषद शनिवारी (ता. ११) सायंकाळी चार वाजता एअरपोर्ट सेन्ट्रल पाईंट हाॅटेल येथे आयोजिण्यात आली होती. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी बाळासाहेब घरडे, महेंद्र मानकर, मनोज मेश्राम, संदेश तांबे, विनोद थूल, पुरनचंद्र मेश्राम आदी उपस्थित होते. महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लक्ष करीत आहे. यामुळे मुख्यमंत्री त्रस्त झाले आहे. त्यांनी महाविकासआघाडीतून बाहेर यावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

हेही वाचा: पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी; ती काय वाचा

युतीत या आणि मुख्यमंत्रिपद वाटून घ्या

महाविकासआघाडीमधील मंत्री सातत्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत असतात. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत असतात. महाविकासआघाडीमध्ये राहून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी भाजप व आरपीयआय सोबत युतीचे सरकार स्थापन करावे आणि मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षांसाठी वाटून घ्यावे, आवाहन रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना केले.

२० जूननंतर पंतप्रधान मोदींची भेट घेणार

दलित व आदिवासींना ७० वर्षांपासून नोकरीत पदोन्नतीमध्ये आरक्षण दिले जात आहे. आता ते दिले जात नसल्यामुळे दलित, आदिवासी अधिकाऱ्यांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात मुंबई येथे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. इतर काही विषयांना घेऊन देवेंद्र फडणवीस, महादेव जानकर, विनायक मेटे, चंद्रकांत पाटील २० जूननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहो, असेही आठवले म्हणाले.

हेही वाचा: कंत्राटी डॉक्टरांच्या खासगी वैद्यकीय व्यवसायावर निर्बंध; वैद्यकीय अधीक्षकांना पत्र

मराठा समाजाला आरक्षण द्या

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. तसेच क्षत्रिय समाजाला आरक्षण दिले पाहिजे. जाट, ठाकूर, रेड्डी, राजपूत आदींना १२ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. राज्यसभेमध्ये आपण हा विषय मांडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी यावर चर्चा करणार आहे, असेही रामदास आठवले म्हणाले.

(Ramdas-Athavale's-appeal-to-the-Chief-Minister-to-form-government-with-Bjp)

loading image
go to top