
नागपूर : चंद्रपूरजवळ असलेल्या दुर्गापूर खुल्या कोळसा खाणीच्या विस्तारीकरणासाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. प्रतिवादींनी गेल्या ऑगस्टपासून याचिकेवर उत्तर सादर न केल्याने न्यायालयाने गेल्या महिन्यात दोन आठवड्यांचा अवधी दिला होता.