
अचलपूर : भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने बोरगावपेठ येथील बीएसएफ महिला सैनिक रेश्मा भारत इंगळे आपल्या एक वर्षाच्या चिमुकल्याला घरी सोडून घरच्यांचा आशीर्वाद घेत भारताने राबविलेल्या ‘सिंदूर’ मोहिमेसाठी आपल्या कर्तव्यावर रवाना झाल्यात. कुटुंबापेक्षा देशाच्या सुरक्षेला महत्त्व देणाऱ्या या महिला सैनिकाच्या देशप्रेमाला कुटुंबाने तथा बोरगावपेठ ग्रामस्थांनी सलाम करीत भारत मातेच्या घोषणा देत रेश्मा इंगळे यांना पाठबळ दिले.