Nagpur : दिव्यांगांच्या हाती पुन्हा ई-रिक्षाचे स्टेरिंग; ७४ गरजूंना मिळणार वाहन परवाना

शहरातील ७४ गरजूंना मिळणार लवकरच वाहन परवाना
E-rickshaw for disabled 74 needy people get vehicle license nagpur
E-rickshaw for disabled 74 needy people get vehicle license nagpursakal

नागपूर : ई-रिक्षा चालवण्यासाठी वाहन परवाना सक्तीचा केल्याने अनेक दिव्यांगांचा रोजगार गेला. मात्र जिल्हा पुनर्वसन केंद्र, मेडिकल, महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासनाच्या संयुक्त उपक्रमातून मेडिकलमध्ये दिव्यांगांची विशेष शिबिरात वैद्यकीय तपासणी झाली आणि पहिल्यांदा दिव्यांग बांधवांना वाहन परवाना मिळाला. त्यामुळे लवकरच दिव्यांग बांधवांच्या हाती ई-रिक्षाचे स्टेरिंग पुन्हा येणार आहे.

दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने १९९९ मध्ये जिल्हा पातळीवर दिव्यांग पुनर्वसन केंद्र ही योजना सुरू केली. देशातील २७० जिल्ह्यांना सरकारने या योजनेच्या कक्षेत घेतले. दिव्यांग प्रमाणापासून तर दिव्यांगाना विविध योजनांच्या लाभासाठी सरकारने पॉलिसी तयार केली.

त्याअंतर्गत शहरातील दिव्यांग बांधवांना वाहन परवान्याची गरज लक्षात घेता महापालिकेच्या पुढाकारातून मेडिकलमध्ये विशेष तपासणी अभियान राबवले. पहिल्या टप्प्यात ७४ दिव्यांग बांधवांचे असेसमेंट केले. डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतर त्यांना लवकरच वाहन परवाना मिळणार आहे.

वाहन परवाना सक्तीचा

दिव्यांगांच्या पुनर्वसनाला गती देता यावी यासाठी महापालिकेने त्यांना ई रिक्षाचे वाटप केले होते. मात्र वाहन परवाना अधिनियमात झालेल्या बदलानुसार ई रिक्षा साठी देखील वाहन परवाना सक्तीचा केला. जे दिव्यांग पूर्वी इ रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे, त्यांच्याकडे वाहन परवानाच नसल्याने त्यांच्या ई रिक्षाची चाके थांबली. दिव्यांगाच्या जगण्याची गरज लक्षात घेता महापालिकेने दिव्यांगासाठी विशेष वैद्यकीय तपासणी शिबिर घेतली.

E-rickshaw for disabled 74 needy people get vehicle license nagpur
Nagpur : बांधकामासाठी अग्निशमन सेवा शुल्क वाढणार; राज्यात सरसकट एकच सेवा शुल्क

मेडिकलचे परिश्रम

मेडिकलच्या पेइंग वॉर्डात व्यवसायोपाचर व भौतिकोपचार विभागाच्या सहकार्याने राबविलेल्या या शिबिरात पहिल्याच दिवशी ७४ दिव्यांग बांधवांची तपासणी केली. वाहन परवान्यासाठी त्यांचे असेसमेंट करण्यात आले. डॉक्टरांनीच दिव्यांग बांधवांचे प्रमाणीकरण केल्याने दिव्यांग बांधवांना वाहन परवाना मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांच्या थांबलेल्या रोजगाराला चालना मिळण्याचे संकेत मिळाले.

E-rickshaw for disabled 74 needy people get vehicle license nagpur
Nagpur : तीन आमदारांकडून घेतले पैसे? ‘तोतया पीए’ला आज नागपुरात घेऊन येणार

स्मार्ट सिटीकडून १५० ई रिक्षा वाटप

शहरातील वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत प्रशासन विविध उपक्रम राबवीत आहे. याचाच एक भाग म्हणून स्मार्ट सिटीच्यातीने आणखी १५० दिव्यांगांना ई रिक्षा वाटप केले जाणार आहे. प्रत्येकी २ लाख रुपये प्रमाणे ३ कोटी रुपये खर्चून मेट्रो स्टेशनजवळ ई रिक्षा स्टँड उभारले जाणार आहे. या ठिकाणी ई रिक्षा चार्जरची देखील सोय स्मार्ट सिटी करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com