ई-व्होटिंग मशीन : देशात कुठूणही बजावता येणार मतदानाचा हक्क

ई-व्होटिंग मशीन : देशात कुठूणही बजावता येणार मतदानाचा हक्क

नागपूर : मतदार नोंदणी कुठेही झाली असली आणि मतदानाच्या दिवशी देशातील कोणत्याही शहरात असले तरीही बोटांचे ठसे आणि आधार लिंक्ड इलेक्ट्रिक मतदान प्रणालीमुळे आता मतदानाचा हक्क बजावता येणे शक्य होणार आहे. हे अनोखे ई-व्होटिंग मशीन बनवले आहे विदर्भाच्या मातीत जन्मलेला २३ वर्षीय युवक आनंद मिश्रिकोटकर याने... हे मशीन पायलट प्रोजेक्ट म्हणून राज्यात वापरण्यात यावे, यासाठी तो प्रयत्न करीत आहे. (E-voting-machine-Right-to-vote-Machine-News-Anand-Mishrikotkar-nad86)

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील मुळ रहिवासी असलेला आनंद सध्या पुणे येथील महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत नोकरीला आहे. कऱ्हाड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनियरिंग पूर्ण करीत असतानाच २०१८ मध्ये त्याने हे मशीन तयार केले. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सनस यांची भेट घेऊन माहिती दिली. त्यांना तो प्रोजेक्ट आवडला. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ई-व्होटिंग करता येईल, असे उपायुक्तांनी आश्वासन दिले. त्यावेळी आनंदच्या प्रोजेक्टला आवश्यक ते आर्थिक सहाय्य मिळू न शकल्याने हा प्रोजेक्ट मागे पडला.

ई-व्होटिंग मशीन : देशात कुठूणही बजावता येणार मतदानाचा हक्क
सत्तांतरानंतर प्रश्न रखडला; पाच एव्हरेस्टवीर नोकरीच्या प्रतीक्षेत

असे होते ई-व्होटिंग

ई-व्होटिंग मशीन ही एटीएमसारखी आहे. त्यामुळे या मशीनचा प्रयोग राज्यात करणे सहजशक्य आहे. राज्य निवडणूक आयोग स्वतःच्या अधिकारक्षेत्राअंतर्गत अशा प्रकारच्या मशीन तयार करू शकते. या मशीन सर्व पोलिस स्टेशन, महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये लावण्यात याव्यात, अशी आनंदची इच्छा आहे. ज्या व्यक्तीला मतदान करायचे आहे, त्याच्या बोटाचे ठसे स्कॅन होतील. स्कॅन होत नसल्यास मशीनमधील क्यूआर कोड स्कॅनरद्वारे आधारकार्डवरील क्रमांक स्कॅन होऊन मतदाराला त्याची नोंदणी असलेल्या मतदार संघातील उमेदवाराला मतदान करता येईल.

अनेक महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर ई-व्होटिंग मशीन तयार केले आहे. या मशीनमुळे देशातील कोणत्याही भागांतून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यामुळे याचा पायलट प्रोजेक्ट म्हणून राज्यात वापर व्हावा, अशी इच्छा आहे.
- आनंद मिश्रिकोटकर

(E-voting-machine-Right-to-vote-Machine-News-Anand-Mishrikotkar-nad86)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com