

Nitin Gadkari E20 Petrol Controversy
Esakal
इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत सोशल मीडियावर गैरसमज पसरवल्या प्रकरणी चार इन्फ्लुएन्सरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला असून यात बिहारसह देशातील चार इन्फ्लुएन्सरचा समावेश आहे. त्यांनी इथेनॉल आणि ई२० पेट्रोलविरोधात दिशाभूल करणारे व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप आहे.