
नागपूर : विदर्भात यंदा मॉन्सूनचे अपेक्षेपेक्षा लवकर आगमन झाल्यानंतर बळीराजासह सर्वसामान्यांनाही जूनमध्ये दमदार पावसाची अपेक्षा होती. मात्र, वरुणराजाने निराशा केली आहे. अकरापैकी केवळ सहा जिल्ह्यांमध्ये सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून, नागपूरसह पाच जिल्हे रेड झोन अर्थात नाजूक स्थितीत असल्याचे निराशाजनक चित्र दिसून येत आहे.