
साळवा : मे महिन्यात आणि रोहिणी नक्षत्रात सर्वत्र चांगला पाऊस झाला. अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचले. नदी, नाले भरून वाहते झाले. या पावसाच्या आगमनानंतर अनेक शेतकऱ्यांनी पेरणीचा विचार सुरू केला. तर अनेक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पेरणीला सुरुवात देखील केली. मात्र, या कालावधीमध्ये पडणारा पाऊस हा भरवशाचा पाऊस नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, पावसाचा खंड पडल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते, अशी भीती शेती तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.