सीमा तपासणी नाक्‍यावर दिवसाला 10 लाखांची कमाई, अधिकारी मालामाल, काय आहे प्रकरण...

 केळवद : नागपूर-छिंदवाडा रस्त्यावरील राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 547 या रस्त्यावरील तपासणी नाका.
केळवद : नागपूर-छिंदवाडा रस्त्यावरील राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 547 या रस्त्यावरील तपासणी नाका.

केळवद (जि.नागपूर) : नागपूर-छिंदवाडा रस्त्यावरील राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 547 या रस्त्यावरील केळवद येथे असणाऱ्या सीमा तपासणी नाक्‍यावर वाहनचालकाकडून 300 ते 2,000 रुपये इतकी अवैधरीत्या वसुली केली जात आहे. रुण या सीमा तपासणी नाक्‍यावर कार्यरत असणारे आरटीओ अधिकारी मालामाल होत आहेत. याकडे संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष देण्यास टाळाटाळ करीत असल्याने या चेक पोस्टवर वाहनचालकाकडून होणारी पैशाची पठाणी वसुली कधी थांबणार, हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

अधिक वाचा : आईबाबा, मी या दुनियेत नसलो तर...असा प्रश्‍न विचारून अभियंत्याने केले हे...

दररोज जातात दोन हजार अवजड वाहने
नागपूर-शिवनी-जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग 30 मेपासून काही महिन्यांसाठी बंद केल्याने या रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक नागपूर-छिंदवाडा महामार्गाने केळवद व्हाया होत आहे. यामुळे या रस्त्यावर चार पटीने वाहतूक वाढली आहे. यात जडवाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. मालवाहतुकीच्या ट्रकचालकांकडे संपूर्ण वाहनाची कागदपत्रे, वाहनातील माल "अंडरलोड' असताना 300 ते 500 रुपये येथील आरटीओ अधिकारी वसुली करीत आहेत. कार कॅरिअर, फट्टा ट्रेलर या वाहनातून नव्या कार तसेच ट्रॅक्‍टरची वाहतूक केली जाते. या वाहनांकडून 1,000 ते 2,000 रुपये प्रतिवाहन येथे अवैधरीत्या वसुली होते. ट्रकचालक, मालकांनी विचारणा केल्यास वाहनाला बराच वेळ थांबवून त्याची पिळवणूक केली जाते. दिवसाला या रस्त्यावरून दोन हजार जड वाहने
जाणे-येणे करीत असल्याने दिवसाकाठी 10 लाख रुपयांची अवैध वसुली या चेक पोस्ट नाक्‍यावर केली जात आहे. चार दिवसांसाठी दोन आरटीओ अधिकारी येथे कामावर कार्यरत राहतात. यामुळे प्रत्येक
आरटीओ अधिकारी मोठ्या प्रमाणात चार दिवसांत अवैधरीत्या ट्रकचालकांकडून पैशाची वसुली करतात.

कायमस्वरूपी अधिकाऱ्याची उणिव
या चेक पोस्टवर वर्षभर अथवा पाच वर्षांसाठी आरटीओ अधिकाऱ्यांची नेमणूक नसते. महिन्याला आठ आरटीओ कार्यरत असल्याने प्रत्येक आरटीओ चार दिवसांच्या कालावधित ड्यूटीवर असल्याने कमी कालावधीत जास्त पैसै कमावण्याचे धाडस करतात.

हेही वाचा : सर्वसामान्य कोरोनासोबत जगण्याची कला हळूहळू अवगत करीत आहेत...वाचा हा रिपोर्ट..

वाहनचालक विरोध करणे टाळतात
या चेक पोस्टवर जड वाहनांची रांग एक ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत असते. अशातच बऱ्यांच वाहनात कच्चा माल, वेळेवर धावणारे वाहन (टायमिंग गाडी) तसेच हजारो किलोमीटर प्रवास करावा लागत असल्याने, तसेच कागदपत्रे ओके, वाहनातील माल अंडरलोड असतानासुद्धा येथील आरटीओ अधिकाऱ्यांशी हुज्जत न घालता मागेल तेवढे पैसै सहज देतात.

...तर लाचलुचपत विभागाकडे तक्रार करा !
असला प्रकार येथे होत नाही. होत असेल, तर थेट लाचलुचपत विभागाकडे ट्रकचालक, मालकांनी तक्रार करावी.
-बजरंग थ्रमाटे
आरटीओ अधिकारी, नागपूर (ग्रामीण)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com