Nagpur Water Supply: पूर्व नागपुरातील मिनीमातानगर पाणी टाकी कामामुळे बुधवारी संपूर्ण पाणीपुरवठा खंडित
Nagpur News: पूर्व नागपुरातील मिनीमातानगर पाणी टाकीचा वॉल बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवार रोजी सकाळी १० ते रात्री १० यावेळेत पूर्व नागपुरातील बहुतांश वस्त्यांमधील पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.
नागपूर : पूर्व नागपुरातील मिनीमातानगर पाणी टाकीचा वॉल बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवार (ता.१५) रोजी सकाळी १० ते रात्री १० यावेळेत पूर्व नागपुरातील बहुतांश वस्त्यांमधील पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.