
नागपूर : लॅपटॉप बॅग, फाईल फोल्डर, बास्केट, योगा मॅट, डायनिंग व डिनर मॅट, कस्टमाइज गिफ्ट अशा अनेक वस्तू जलस्त्रोतांना विळखा देणाऱ्या जलपर्णीपासून तयार करण्यात आल्या आहेत. या सर्व वस्तूंचे स्टॉल्स मनपाच्या समाजविकास विभागाद्वारे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्यात लावण्यात आले आहेत.