Central Security Force
sakal
नागपूर - महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर विदर्भात वर्षानुवर्षे खुलेआम सुरू असलेल्या रेती माफियांच्या साम्राज्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाई केली. सावनेर रेती घोटाळ्याप्रकरणी ईडीने शुक्रवारी जिल्ह्यात एकाचवेळी ५६ ठिकाणी धडक कारवाई करत राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेला हादरवून सोडले. या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.