Nagpur : ‘टास्क’च्या नादात गमावले शिक्षणाचे पैसे; सायबर चोरट्याकडून ३५ लाख ६० हजारांनी फसवणूक

अधिक नफ्याच्या आमिषापोटी वेगवेगळ्या खात्यातून सौरवने ३५ लाख ६० हजार २८४ रुपयाची गुंतवणूक केली.
Nagpur
NagpurSakal
Updated on

नागपूर - मुलाचे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याला विदेशात जायचे होते. वडिलांनी पै-पै करीत पैसे जमवले पण मुलाने ‘टास्क’च्या नादात ३५ लाख ६० हजार रुपये गमावल्याची घटना उघडकीस आली आहे. सौरव बाबाराव घवघवे(वय २७) असे युवकाचे नाव आहे. पोलिसांनी सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Nagpur
Mumbai Rain: मुंबईत आज मुसळधार! मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; नागरिकांना केलं महत्वाचं आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव घवघवे याचे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाले असून त्याला पुढच्या शिक्षणासाठी विदेशात जायचे होते. वडील बाबाराव घवघवे(रा. स्वामी नारायण मंदिर समोर, पेट्रोल पंप ) यांचे सिंदी रेल्वे येथे कृषी केंद्र आहे.

दिवसरात्र मेहनत करीत त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी पैसे जमविले होते. ११ जुलैला सौरव याला ८४९२२५१४६१८ या क्रमांकाच्या @ ana6688@ecce9892 या टेलिग्राम युजर आयडीवरून संदेश आला. त्याला पार्ट टाईम जॉबची ऑफर दिली.

टास्क देऊन ते पूर्ण केल्यास जास्त नफा देण्यात येईल, असे आमिष दाखविण्यात आले. काही दिवस ‘टास्क’ पूर्ण केल्यावर नफा मिळाल्याने सौरवचा त्याच्यावर विश्‍वास बसला.

Nagpur
Nagpur News : गणेशपेठ क्वार्टरमधील भीषण वास्तव; एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंब दहशतीच्या छायेत

‘टास्क’च्या नादात गमावले शिक्षणाचे पैसे

शिकार जाळ्यात अडकल्याचे पाहून सायबर चोरट्याने जास्त गुंतवणूक केल्यास जास्त नफा देण्याची बतावणी केली. त्यामुळे अधिक नफ्याच्या आमिषापोटी वेगवेगळ्या खात्यातून सौरवने ३५ लाख ६० हजार २८४ रुपयाची गुंतवणूक केली. मात्र, नफा मिळत नसल्याने त्याने ही रक्कम परत मागितली. रक्कम परत मिळवायची असल्यास अधिक पैसे भरावे लागतील, असे सांगितले.

Nagpur
Nashik Cyber Crime: ऑनलाईन फसवणूक झालेले दीड लाख मिळाले परत; तक्रारदाराने मानले सायबर पोलिसांचे आभार

सौरवच्या पायाखालची जमीनच सरकली. आपली फसवणूक होत झाल्याचे त्याला समजले. सौरवने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पोलिस उपनिरीक्षक औटी यांनी सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरूवात केली आहे.

Nagpur
Cyber Attacks : देशात आठवड्याला एका कंपनीवर होतात २,००० सायबर हल्ले; जगभरातील हल्ल्यांमध्ये मोठी वाढ
Nagpur
Nagpur : तलाठी पदभरती अर्ज प्रक्रियेत खोळंबा, ऐन शेवटच्या दिवशी वेबसाईट बंद; हेल्पलाईनही हेल्पलेस

इन्स्टाग्राम, टेलिग्रामचा वापर

सायबर चोरट्यांकडून सातत्याने ‘टास्क’च्या माध्यमातून फसवणूक करण्यासाठी इन्स्टाग्राम आणि टेलिग्राम आयडी वापर केल्या जातो. या आयडीवरून येणाऱ्या संदेशांमध्ये ‘पार्ट टाईम जॉब’ आणि ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावावर गुतंवणूक करून जास्त नफा देण्याचे आमिष दाखविले जाते.

अनेक जाहिराती आणि इतर माध्यमातून आमिषांचा मारा केला जातो. पण त्यावर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com