esakal | नागपूर : आठवीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

student suicide

नागपूर : आठवीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : ज्या वयात खेळणे-बागडणे किंवा बालहट्ट करायला हवेत, अशा वयातील मुले आयुष्य या शब्दाचा अर्थ कळण्यापूर्वीच अगदी टोकाचा निर्णय घेत आहेत. अगदी १२ वर्षांच्या मुलाने चक्क घरात गळफास घेऊन आत्महत्या करीत जीवन संपविल्याची घटना समोर आली आहे. अजय सुधीर जांभूळकर (शिवनकरनगर, नंदनवन) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याने नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर जांभूळकर हे एका हॉटेलमध्ये आचारी आहेत. ते पत्नी सारिका व मुलगा अजय आणि मुलगी स्विटीसह राहतात. सारिका मिळेल ते काम करतात. अजय हा आदर्श हायस्कूलमध्ये आठवीचा विद्यार्थी आहे. बुधवारी नेहमीप्रमाणे सुधीर आणि सारिका हे दोघेही कामावर निघून गेले. घरी अजय आणि सात वर्षांची बहिण होती. दुपारी साडेचार वाजता बहिण बाहेर खेळत होती. अजयने घरातील आईची ओढणी घेतली आणि खिडकीच्या सळाखीला बांधली. गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर एका शेजारी त्याच्या घरी आला असता त्याला अजय लटकलेला दिसला. त्याने शेजाऱ्यांना बोलावले. शेजाऱ्यांनी अजयच्या आईवडीलाला फोन केला आणि बोलावून घेतले. अजयला खाली उतरवले आणि रूग्णालयात नेले. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

हेही वाचा: नागपूर : कॅन्सर इन्स्टिट्यूटसाठी ‘टाटा’ची मदत

मुलांना समजून घ्या

सध्याच्या वेगवान युगात नात्यांमधील जवळीक कमी होत आहे. मोबाईलच्या वेडापायी तर अनेक किशोरवयीन मुले आई-वडिलांसोबतही संवाद साधत नाहीत. पालकही कामात व्यस्त असल्याने मुलांच्या मनात नेमके काय चालले आहे याचा अंदाज घेण्यात कमी पडताहेत. अगदी १२ वर्षाचा मुलगा जर आत्महत्‍या करीत असेल तर खरोखरच समाजाने अंतर्मुख होण्याची गरज आहे.

loading image
go to top