Nagpur Accident : नागपुरात भरधाव स्कूल बसने सायकलस्वाराला उडवलं अन्..., अपघाताचा व्हिडिओ आला समोर

Nagpur Accident : . भरधाव स्कूल बसने रस्त्याच्या कडेवरून जात असलेल्या सायकस्वार वृद्धाला उडवल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
Nagpur Accident : नागपुरात भरधाव स्कूल बसने सायकलस्वाराला उडवलं अन्..., अपघाताचा व्हिडिओ आला समोर

गेल्या काही दिवसांमध्ये भीषण अपघाताची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. नुकतचं घडलेलं वरळीतील हिट अँड रन प्रकरण ताजं असतानाच आता नागपूरमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव स्कूल बसने रस्त्याच्या कडेवरून जात असलेल्या सायकस्वार वृद्धाला उडवल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. रत्नाकर रामचंद्र दीक्षित वय 63 वर्ष असं अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. रत्नाकर दीक्षित सायकलवर जात असताना मागून येणाऱ्या स्कूल बसने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल (८ जुलै) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रत्नाकर दीक्षित हे आपल्या सायकलवरून छोटा ताजबाग ते तुकडोजी चौक या मार्गावरून जात होते. या दरम्यान मागून भरधाव स्कूल बस आली. या बसने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ते सायकलवरून खाली पडले. ते गंभीर जखमी झाले होते.

Nagpur Accident : नागपुरात भरधाव स्कूल बसने सायकलस्वाराला उडवलं अन्..., अपघाताचा व्हिडिओ आला समोर
Mumbai hit and run: महिलेला चिरडलं अन् चालकाला BMW चालवायला दिली, वडिलांनी पळून जाण्यास सांगितलं; पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

या घटनेनंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना रत्नाकर दीक्षित यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Nagpur Accident : नागपुरात भरधाव स्कूल बसने सायकलस्वाराला उडवलं अन्..., अपघाताचा व्हिडिओ आला समोर
Mumbai Hit and Run: दोघांना उडवल्यावर मिहीर प्रेयसीच्या घरी झोपला अन् मग झाला फरार

अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

या भीषण अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दीक्षित हे सायकलवर जात असताना पाठीमागून येणाऱ्या स्कूल बसने त्यांना जोरदार धडक दिल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. या घटनेनंतर हुडकेश्वर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत स्कूल बसच्या चालकाला अटक केली. तपास सुरू असून, पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे.

Nagpur Accident : नागपुरात भरधाव स्कूल बसने सायकलस्वाराला उडवलं अन्..., अपघाताचा व्हिडिओ आला समोर
Worli Hit And Run Case: 'अपघात झाल्याचं समजलं तरीही अंगावर घातली गाडी अन्...'; वरळी हिट अँड रन प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com